Pathaan Trailer: शाहरुखच्या 'पठान'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला, शीर्षकाच्या बाबतीत निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:26 IST2023-01-04T13:26:29+5:302023-01-04T13:26:55+5:30
Pathan Trailer: आगामी हिंदी चित्रपट 'पठाण' बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे.

Pathaan Trailer: शाहरुखच्या 'पठान'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला, शीर्षकाच्या बाबतीत निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'पठाण' (Pathaan) चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पठाण'च्या ट्रेलरसाठी सगळेच उत्सुक दिसत आहेत. दरम्यान, 'पठाण'च्या ट्रेलरबाबत निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. होय, बुधवारी 'पठाण'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत 'पठाण'चा ट्रेलर कधी रिलीज होणार हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे. दरम्यान, ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर झाल्यामुळे 'पठाण' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बुधवारी प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'पठाण'च्या ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेची माहिती दिली. तरण यांच्या म्हणण्यानुसार, 'पठाण'चा ट्रेलर पुढील आठवड्यात १० जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. 'पठाण'चा हा अॅक्शन-पॅक्ड ट्रेलर पाहण्यासाठी आत्ताच तयार व्हा. 'पठाण' हा चित्रपट या महिन्यात २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अलीकडे देशातील विविध राज्यांमध्ये 'पठाण' संदर्भात तीव्र निदर्शने होत आहेत. 'पठाण' चित्रपटाच्या शीर्षकावर मोठा आक्षेप घेतला जात होता आणि समीक्षकांनीही चित्रपटाचे शीर्षक बदलले नाही तर ते त्यांच्या शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे सांगितले. अशा परिस्थितीत तरण आदर्शने असेही सांगितले आहे की 'पठाण' या शीर्षकात कोणताही बदल होणार नाही आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये त्याच नावाने प्रदर्शित केला जाईल.