Pathaan Day ! आज ११० रुपयात पाहता येणार किंग खानचा 'पठाण', काय आहे कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:22 PM2023-02-17T12:22:40+5:302023-02-17T12:23:00+5:30

२५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला पठाण ३ आठवडे उलटून गेले तरी तुफान कमाई करत आहे.

Pathan Day! King Khans Pathan can be seen today for 110 rupees know why | Pathaan Day ! आज ११० रुपयात पाहता येणार किंग खानचा 'पठाण', काय आहे कारण ?

Pathaan Day ! आज ११० रुपयात पाहता येणार किंग खानचा 'पठाण', काय आहे कारण ?

googlenewsNext

Pathaan Day ! बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण'ने ५०० कोटी रुपयांची कमाई करत बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला पठाण ३ आठवडे उलटून गेले तरी तुफान कमाई करत आहे. याच निमित्ताने आज शुक्रवारी सर्वत्र 'पठाण' डे साजरा करण्यात येत आहे. केवळ ११० रुपयांत थिएटरमध्ये पठाण बघता येणार आहे. 

'पठाण' रिलीज झाला आणि बॉलिवूडचे बुडते जहाज पुन्हा वर आले. शाहरुख खानचा 'पठाण' रिलीज होणार म्हणल्यावर देशातील अनेक चित्रपटगृहांनाही संजीवनीच मिळाली. कित्येक सिंगल स्क्रीन थिएटर पुन्हा सुरु झाले. पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई पाहता आज १७ फेब्रुवारी रोजी सर्व थिएटर चालकांनी 'पठाण डे' साजरा करण्याचे ठरवले आहे. पीव्हीआर, सिनेपोलिस, आयनॉक्स यासारख्या ठिकाणी तिकिटांचे दर कमी करण्यात आले आहेत. आज पठाणचे तिकीट केवळ ११० रुपयांना मिळत आहे. पठाणने ५०० कोटींचा गल्ला जमवल्याच्या आनंदात ही ऑफर देण्यात आली आहे.

Pathaan Box office: 500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार 

शुक्रवार म्हणलं की सिनेप्रेमींची पावलं आपोआप थिएटरकडे वळतात.ज्यांनी अद्याप पठाण बघितलेला नाही त्यांना स्वस्तात सिनेमा पाहायची ही उत्तम संधी आहे. तर ज्यांना पठाण आवडला ते पुन्हा एकदा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करु शकतात. त्यामुळे आता पठाणच्या कमाईत आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे.500 कोटी क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. यातच आता पठाणची टक्कर बाहुबली 2 सोबत आहे. ज्याचे कलेक्शन 511 कोटी रुपये एवढे आहे.

Web Title: Pathan Day! King Khans Pathan can be seen today for 110 rupees know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.