Pathan: Bycott वाल्यांना प्रकाश राज यांनी सुनावलं, शाहरुखसह पठाणच्या टीमला शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 08:51 PM2023-01-26T20:51:21+5:302023-01-26T20:55:23+5:30

अभिनेता प्रकाश राज यांनीही शाहरुखच्या पठाणचं समर्थन करत टीकाकारांना लक्ष्य केलं आहे. 

Pathan: Prakash Raj told Bycottians, Kudos to Shah Rukh and Pathan's team | Pathan: Bycott वाल्यांना प्रकाश राज यांनी सुनावलं, शाहरुखसह पठाणच्या टीमला शाबासकी

Pathan: Bycott वाल्यांना प्रकाश राज यांनी सुनावलं, शाहरुखसह पठाणच्या टीमला शाबासकी

googlenewsNext

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान(Shahrukh Khan)च्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाने जबरदस्त क्रेझ आणि विरोधादरम्यान पहिल्याच दिवशी कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. तब्बल ४ वर्षांनंतर कमबॅक करत असलेल्या शाहरुखला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत, चित्रपटाने पीव्हीआर आयनॉक्स आणि सिनेपोलिसमध्ये एकूण २०.३५ कोटी रुपयांची कमाई केली होती.  इतर मल्टिप्लेक्स साखळींमध्येही सिनेमा प्रचंड कमाई करत आहे. बंजरंग दलाकडून काही ठिकाणी या चित्रपटाला विरोध झाला. मात्र, विरोधापेक्षा समर्थनही अधिक मिळाल्याचंही सोशल मीडियावर दिसून आलं. अभिनेता प्रकाश राज यांनीही शाहरुखच्या पठाणचं समर्थन करत टीकाकारांना लक्ष्य केलं आहे. 

पठाण चित्रपटात शाहरुख भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात दीपिका आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. २६ जानेवारीच्या उत्साहाचाही पठाणच्या कमाईवर चांगला परिणाम होणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, प्रकाश राज यांनी ट्विट करुन, चित्रपटांवर बायकॉट करणाऱ्यांना टोला लगावला आहे. शाहरुख खानच्या जबरदस्त फिल्मवापसीचं कौतुक करत पठाणच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रकाश राज यांनी यापूर्वी पठाण चित्रपटातील बेशरम या गाण्याचंही समर्थन केलं होतं. तसेच, शाहरुख आणि दिपीक पदुकोन यांचंही खुलेपणे समर्थन केलं होतं. 

दरम्या, मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट येत्या पाच दिवसांत २०० कोटींहून अधिक कमाई करू शकतो. चाहत्यांमध्ये असलेली जबरदस्त क्रेझ पाहून यशराज फिल्म्सनेही रात्री १२.३० वाजता आपले शो सुरू केले आहेत. दिल्ली, एनसीआरमध्ये तिकिटांची किंमत २४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. २५ जानेवारीला रिलीज झालेला पठाण हा चित्रपट वादात सापडला होता. दीपिका पदुकोणने या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात भगवा बिकिनीमध्ये नृत्य केले, ज्याला धार्मिक संघटनांनी विरोध केला आणि चित्रपटाला लक्ष्य केले. बॉयकॉट पठाण देखील सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला परंतु असे दिसते की वादाने चित्रपटाच्या बाजूने काम केले आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वीरित्या ओपनिंगला मदत केली.
 

Web Title: Pathan: Prakash Raj told Bycottians, Kudos to Shah Rukh and Pathan's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.