इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आलाय ‘पौरषपुर’चा ट्रेलर, काहीच दिवसांत मिळाले ८० लाखांहून अधिक व्ह्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:03 PM2021-01-09T16:03:02+5:302021-01-09T16:05:05+5:30

या ट्रेलरमध्ये आपल्याला अनेक लव्हमेकिंग सीन पाहायला मिळत आहेत.

paurashpur trailer goes viral due to intimate scenes | इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आलाय ‘पौरषपुर’चा ट्रेलर, काहीच दिवसांत मिळाले ८० लाखांहून अधिक व्ह्यूज

इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आलाय ‘पौरषपुर’चा ट्रेलर, काहीच दिवसांत मिळाले ८० लाखांहून अधिक व्ह्यूज

googlenewsNext
ठळक मुद्देअल्ट बालाजीवरील ही सगळ्यात बोल्ड वेबसिरिज असून या वेबसिरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. 

एकता कपूरची निर्मिती असलेली आणि नुकतीच रिलीज झालेली ‘पौरषपुर’ ही वेबसीरिज सध्या जाम चर्चेत आहे. या वेबसिरिजचा ट्रेलर लाँच होऊन केवळ एक आठवडा झाला आहे. पण या एका आठवड्यात या ट्रेलरला तब्बल ८३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या ट्रेलरमध्ये असलेल्या लव्हमेकिंग सीनमुळे सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची चांगलीच चर्चा रंगली आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला अनेक लव्हमेकिंग सीन पाहायला मिळत आहेत.

१६ व्या शतकातील एका राज्याची ही कथा यात दाखण्यात आली असून अन्नू कपूर यांनी वासनांध राजा भद्रप्रताप सिंहची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री अश्मिता बख्शीने राणी उमंगलताची भूमिका साकारली आहे. अश्मिताने अन्नू कपूरसोबत बोल्ड इंटिमेट सीन्स दिले आहेत. तसेच मिलिंद सोमणवर देखील या वेबसिरिजमध्ये अनेक इंटिमेट सीन चित्रीत करण्यात आले आहेत. अल्ट बालाजीवरील ही सगळ्यात बोल्ड वेबसिरिज असून या वेबसिरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. 

या वेबसीरिजमध्ये अन्नू कपूर राजा भद्रप्रताप सिंहच्या भूमिकेत आहेत. तर मिलिंद बोरीसच्या भूमिकेत आहे. शिल्पा शिंदे आणि शहीर शेख यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. सत्तेची लढाई, वासना, रक्ताने माखलेल्या तलवारी, युद्ध,कपट, राजकारण अशी पार्श्वभूमी असलेल्या या वेबसीरिजमध्ये अन्नू कपूर यांनी एका वासनांध राजाची भूमिका साकारली आहे. त्याच्या राज्यात महिलांना केवळ भोगाची वस्तू मानले जाते. पुरुषाच्या कुठल्याही मागणीला नकार देण्याचा अधिकार नाही. यात मिलिंदने बोरिस नावाच्या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे.

Web Title: paurashpur trailer goes viral due to intimate scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.