पवनदीप व अरूणिता रिलेशनशिपमध्ये? फोटो लीक होताच पुन्हा सुरू झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:06 IST2022-03-09T16:04:41+5:302022-03-09T16:06:42+5:30
Arudeep : सध्या अरूणिता व पवनदीप यूएसमध्ये आहे. याठिकाणी त्यांचे लाइव्ह शो सुरू आहेत. फावल्या वेळात मात्र हे दोघंही एकमेकांसह वेळ घालवत आहेत.

पवनदीप व अरूणिता रिलेशनशिपमध्ये? फोटो लीक होताच पुन्हा सुरू झाली चर्चा
‘इंडियन आयडल 12’ हा शो कधीच संपला. पण पवनदीप राजन (Pawandeep Rajan)आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal ) या जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. अरूदीप नावाने लोकप्रिय झालेली ही जोडी नात्यात असल्याच्या चर्चा आहेत. खरं तर शो सुरू असतानाच अरूणिता व पवनदीप यांच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची चर्चा सुरू झाली होती. पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असंच दोघंही सांगत होते. शो संपला, त्यानंतरही आम्ही फक्त मित्र आहोत, असंच दोघं सांगत राहिले. आता पुन्हा एकदा अरूदीपच्या नात्याची चर्चा होताना दिसतेय. होय, दोघांचे लेटेस्ट फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर #Arudeep ट्रेंड होतंय.
सध्या अरूणिता व पवनदीप यूएसमध्ये आहे. याठिकाणी त्यांचे लाइव्ह शो सुरू आहेत. फावल्या वेळात मात्र हे दोघंही एकमेकांसह वेळ घालवत आहेत. ड्रमर तुषार कामरा याने दोघांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अरूणिता व पवनदीपची बॉन्डिंग स्पष्ट दिसते. त्यामुळेच दोघांच्या डेटींगच्या चर्चांना पुन्हा जोर चढला आहे. हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
अरूणिता व पवनदीप युएसमध्ये एकटे गेलेले नाहीत. इंडियन आयडल 12 मधील सायली कांबळे आणि मोहम्मद दानिश हे देखील त्यांच्यासोबत आहेत.
इंडियन आयडल 12चा विजेता पवनदीप राजन आणि शोची फर्स्ट रनर-अप अरूणिता कांजीलाल या जोडीनं आपल्या मधूर आवाजानं चाहत्यांना जणू वेड लावलं आहे. शो दरम्यान या एका जोडीची सर्वाधिक चर्चा झाली. त्यांच्या आवाजावर फॅन्स फिदा होतेच, पण त्यांची केमिस्ट्रीही लोकांना भावली. शो संपला आणि या जोडीनं एकत्र असे अनेक म्युझिक व्हिडीओ व इव्हेंट केलेत. शिवाय म्युझिक डायरेक्टर राज सूरानी यांच्या म्युझिक व्हिडीओची सीरिजही साईन केली.