पायल घोषने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली - 'अनुराग कश्यपने 'त्या' दिवशी गांजा ओढला होता...'
By अमित इंगोले | Published: October 15, 2020 01:32 PM2020-10-15T13:32:14+5:302020-10-15T13:35:30+5:30
आता तिने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यासोबत लिहिले की, शेवटपर्यंत एकटीच लढेन. या व्हिडीओत तिने दावा केला आहे की, अनुरागने तिच्यासमोर गांजा घेतला होता.
पायल घोष गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप तिने लावला आहे. त्याबाबत सोशल मीडियावर ती सतत काहीना काही शेअर करत असते. आता तिने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यासोबत लिहिले की, शेवटपर्यंत एकटीच लढेन. या व्हिडीओत तिने दावा केला आहे की, अनुरागने तिच्यासमोर गांजा ओढला होता.
या व्हिडीओसोबत पायल कॅप्शनला लिहिले की, थोड्याशा डिटेल आणि सत्याने कुणाला काही कष्ट होणार नाही. दोषीला बाहेर येऊन याचं खंडन करू द्या, चला सत्याचा शोध घेऊ. जर याने तुमच्यातील महिला जागी होत नसेल आणि तुमच्या आतील माणसाला न्याय मिळवायचा नसेल तर माहीत नाही हे कुणाकडून होईल. (पायल घोषने मागितली रिचा चढ्ढाची माफी; न्यायालयाकडून मानहानीचा दावा निकाली)
A little bit of details and truth hurt nobody. Let the culprit come and refute it and let's find out the truth. . If this doesn't ignite the woman in you and the human in you craving for justice, don't know what will. #FightTillTheEnd pic.twitter.com/n6Ki4Et15l
— Payal Ghosh (@iampayalghosh) October 14, 2020
पायलने सांगितले त्या दिवसाची घटना
पायलने या व्हिडीओत सांगितले की, 'मी मिस्टर कश्यपला फेसबुकच्या माध्यमातून ओळखत होते. त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. मी गेले होते. त्यांनी मला घरी बोलवलं मी तिथेही गेले. आमच्यात बोलणं झालं. जेवण केलं आणि मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलवलं तेव्हा ते ड्रिंक आणि स्मोक करत होते. वेगळाच वास येत होता. मला उलटीसारखं होत होतं. मी विचारलं सर हे काय आहे. तर त्यांनी सांगितलं गांजा. मग ते मला दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेले. पायलने सांगितले की, अनुरागने कपडे काढले आणि जबरदस्ती करू लागले. जेव्हा मी नाही म्हणत होते तर त्यांनी XYZ ची नावे घेतली आणि ४००, ५०० मुलींची नावे घेऊन मला कन्विंस करू लागले. पायल म्हणाली की, ते जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते. ३७६ लागला आहे तर तुम्हाला माहीत असेलच की प्रयत्न करत होता म्हणजे काय झालं होतं. (ही माफिया गँग मला ठार मारेल...! पायल घोषने थेट पीएम मोदींकडे मागितली मदत)
'एकटी लढत राहीन, पण सोडणार नाही'
त्यानंतर पायल म्हणाली की, जे काही झालं त्या विरोधात मी लढत आहे. मी एकटीच लढत आहे. कारण कुणीही साथ देत नाहीय. इथे सगळे फेक लोक भरलेले आहेत. पण मी कुणालाही सोडणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढत राहीन. जे लोक माझ्यासोबत उभे आहेत आणि सपोर्ट करत आहे त्यांचे आभार.