पायल रोहतगी पुन्हा बरळली, शिवाजी महाराजांवर लिहिली वादग्रस्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:09 PM2019-06-03T13:09:52+5:302019-06-03T13:10:03+5:30

अगदी अलीकडे पायलने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. आता पायलने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे.

payal rohatgi post on shivaji maharaj and maratha reservation | पायल रोहतगी पुन्हा बरळली, शिवाजी महाराजांवर लिहिली वादग्रस्त पोस्ट

पायल रोहतगी पुन्हा बरळली, शिवाजी महाराजांवर लिहिली वादग्रस्त पोस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी पायलने नथुराम गोडसेची पाठराखण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे, या सुपरस्टार कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी ही पोस्ट होती.

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अगदी अलीकडे पायलने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. आता पायलने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे.
  तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.  शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय मराठा आरक्षणावरही आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले? असा थेट सवालही तिने केला आहे.

 स्वत:चे आणि पती संग्राम सिंगचा फाटो सोबत तिने ही पोस्ट लिहिली आहे.  तूर्तास तिच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
काही दिवसांपूर्वी पायलने नथुराम गोडसेची पाठराखण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे, या सुपरस्टार कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी ही पोस्ट होती.



 ‘कमल हासन यांना दहशतवाद आणि खून याच्यातला फरक कळत नाही. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी गोडसे नसून जिना होते,’असे तिने म्हटले होते. यापाठोपाठ राजा राममोहन राय हे इंग्रजांचे ‘चमचे’ असल्याचे पायलने म्हटले होते.



 ट्विटरवरील इंडियन हिस्टरी पिक्स नावाच्या एका अकाउंटवरून 22 मे रोजी राजा राम मोहन रॉय यांचा एक फोटो शेअर झाला होता. त्यात सतिप्रथेचे कट्टर विरोधक आणि समाज सुधारक असे कॅप्शन देण्यात आले होते. पायल रोहतगी हिने हे  ट्विट शेअर करत पायलने राजा राममोहन रॉय यांच्यावर टीका केली होती. ‘नाही, ते इंग्रजांचे चमचे होते. सती प्रथेला बदनाम करण्यासाठी इंग्रजांनी राजा राममोहन रॉय यांचा वापर केला. सती परंपरा देशात कुठेच सक्तीची नव्हती. मोगल शासकांद्वारे हिंदू महिलांना वेश्यावृत्ती ढकलण्यापासून वाचवण्यासाठी या प्रथेचा जन्म झाला. महिला स्वत:च्या मर्जीने सती जात. सती जाणे कुठल्याही प्रकारे चुकीची वा प्रतिगामी प्रथा नव्हती,’असे तिने या  ट्विटमध्ये म्हटले होते.

Web Title: payal rohatgi post on shivaji maharaj and maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.