कंगनावर भडकलेल्या अभिनेत्रीने साधला निशाणा, फ्लॉप झालेल्या 'धाकड'ची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 17:01 IST2022-05-23T16:59:41+5:302022-05-23T17:01:37+5:30
Payal Rohtagi Lashes Out On Kangana Ranaut: पायल म्हणाली की, ती प्रिमिअरला गेली होती कारण सिनेमाची निर्मिती सोहेल मकलईने केलं आहे. जो तिचा पार्टनर संग्राम सिंहचा मित्र आहे.

कंगनावर भडकलेल्या अभिनेत्रीने साधला निशाणा, फ्लॉप झालेल्या 'धाकड'ची उडवली खिल्ली
Payal Rohtagi Lashes Out On Kangana Ranaut: अभिनेत्री पायल रोहतगीने पुन्हा एकदा कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. पायल नुकतीच कंगनाचा सिनेमा 'धाकड'च्या स्क्रीनिंगला गेली होती. तेव्हा ती म्हणाली होती की, कंगना तिच्यासोबत चांगली वागली नाही. पायल म्हणाली की, ती प्रिमिअरला गेली होती कारण सिनेमाची निर्मिती सोहेल मकलईने केलं आहे. जो तिचा पार्टनर संग्राम सिंहचा मित्र आहे.
ती म्हणाली की, 'धाकड'च्या अभिनेत्रीसोबत बोलण्याचे अनेक प्रयत्न करूनही ती माझ्यासोबत रूड होती. पायलने तिच्या इन्स्टाग्रामवरून कंगनाची बहीण रंगोली चंदेलची प्रशंसा करत लिहिलं की, 'रंगोली तू चांगली व्यक्ती आहेस, पण तुझी बहीण मला बघून खूश नव्हती. ती नाराज होती'.
मीडियासोबत बोलताना तिने उल्लेख केला की, कंगना 'लॉकअप' मधील विजेत्याला बरोबर सिद्ध करण्यासाठी चुकीचं बोलत होती. मला माझ्या विवेकाप्रति इमानदार व्हावं लागेल. कॅमेरामागे असे लोक आहेत जे एका सिनेमात त्यांच्या मेहनतीच्या कमाईची गुंतवणूक करतात.
पायल म्हणाली की, 'मी तिथे गेली होते. कारण सोहेल मकलाईजी संग्रामचे मित्र आहेत. माझ्या पोस्टमध्ये मी म्हणाले की, तिचा सिनेमा फ्लॉप व्हावा. कारण ती रिअॅलिटी शोमध्ये माझ्यासाठी बदमाश शब्दाचा वापर करत होती.
'मी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती मला बघून आनंदी नव्हती'. सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 'दु:खद' सांगता, पायलने मुनव्वर फारूकी आणि त्याच्या फॅन फॉलोइंगची खिल्ली उडवली.