सलमान खानशी या अभिनेत्रीने घेतला पंगा, म्हणाली - 'बॉलिवूड तुझी वैयक्तिक संपत्ती नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 13:00 IST2020-06-26T13:00:11+5:302020-06-26T13:00:36+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने सलमान खानवर निशाणा साधला असून तिने त्याला बॉलिवूड तुझ्या मालकीची नाही त्यामुळे त्याने गुंडागिरी थांबवावी असे म्हटले आहे.

सलमान खानशी या अभिनेत्रीने घेतला पंगा, म्हणाली - 'बॉलिवूड तुझी वैयक्तिक संपत्ती नाही'
बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी बऱ्याचदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने सुशांत सिंग राजपूतच्या एका जुन्या व्हिडिओवरून अभिनेत्री सोनम कपूरवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता तिने बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड त्याच्या मालकीचे नाही त्यामुळे त्याने आपली गुंडागिरी थांबवावी. अन्यथा त्याच्या दुष्कर्मांची फळे त्याला याच जन्मात भोगावी लागतील, अशी टिका पायलने केली आहे.
पायल रोहतगीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने सलमानवर टीका केली आहे. ती म्हणाली की, सुरुवातीला माझ्या मनात सलमान खानबाबत प्रचंड आदर होता. पण गेल्या काही काळात त्याची गुंडागिरी पाहून हा आदर संपला आहे. सलमानची बिइंग ह्युमन कंपनी केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. हिट अॅण्ड रन प्रकरणातून सुटलेल्या सलमानची प्रतिमा सुधारण्यासाठी ही संस्था सुरु करण्यात आली. या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केला जातो असे म्हटले जात आहे. बॉलिवूड त्याच्या मालकीचे नाही त्यामुळे त्याने आपली गुंडागिरी थांबवावी. अन्यथा त्याच्या दुष्कर्मांची फळे त्याला याच जन्मात भोगावी लागतील.
पायल रोहतगीचा हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आला आहे. सलमान खानवर सध्या सोशल मीडियावर खूप टीका होत आहे.
अभिनेता सुशांतच्या आत्महत्येसाठी सलमानला दोषी समजले जात आहे. सलमानच्या गुंडागिरीमुळे सुशांत आत्महत्येसाठी प्रवृत्त झाला असा आरोप केला जात आहे. यापूर्वी दिग्दर्शक अभिनव कश्यपने देखील सलमानची सोशल मीडियावर पोलखोल केली होती.