अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी
By अमित इंगोले | Published: October 16, 2020 02:49 PM2020-10-16T14:49:01+5:302020-10-16T14:58:19+5:30
आता लक्ष्मी बॉम्ब सिनेमा पुन्हा एक सोशल मीडियावर वादात सापडला आहे. सोशल मीडियावरील काही लोकांचा आरोप आहे की, या सिनेमातून लव जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या 'लक्ष्मी बॉम्ब' चा ट्रेलर रिलीज झाला होता. यावर फॅन्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता हा सिनेमा पुन्हा एक सोशल मीडियावर वादात सापडला आहे. सोशल मीडियावरील काही लोकांचा आरोप आहे की, या सिनेमातून लव जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच ज्वेलरी ब्रॅन्ड तनिष्कच्या एका जाहिरातीवरून वादळ उठलं होतं. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार असल्याचं बोलण्यात आलं होतं. कंगनानेही यावर ट्विट केलं होतं. वाद अधिक वाढल्याने कंपनीने जाहिरात परत घेतली होती. 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचं नाव आसिफ सांगितलं जात आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचं नाव प्रिया आहे. तसेच दिवाळीआधीच रिलीज होत असलेल्या या सिनेमाच्या नावावरही काही लोकांनी आक्षेप घेतला आहे.
'लक्ष्मी बॉम्ब' हा तमिळ सिनेमा 'कंचना'चा हिंदी रिमेक आहे. सोशल मीडियावरील लोकांचं म्हणणं आहे की, ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचं नाव राघव होतं. तर या सिनेमात आसिफ कसं झालं आणि हिरोईनच्या भूमिकेचं नाव प्रिया का ठेवलं गेलं. त्यासोबतच लोकांनी या सिनेमाला बॉयकॉट करण्याची अपील करत सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात अक्षय कुमारसोबत किराया अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. या हॉरर-कॉमेडी सिनेमाचं दिग्दर्शन राघव लॉरेन्सने केलं आहे. हा सिनेमा ९ नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. याआधी या सिनेमाचा ट्रेलरवर लाइक्सचा पर्याय बंद करून ठेवल्याने सिनेमाला ट्रोल करण्यात आलं होतं.