‘आलिया, महेश भटला धडा शिकवा...’! नेटकरी भडकले ‘#BoycottSadak2’ म्हणत मैदानात उतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:28 PM2020-08-07T13:28:48+5:302020-08-07T13:30:20+5:30
प्रदर्शनाआधीच ‘सडक 2’ वादाच्या भोव-यात, नेटक-यांनी अशा दिल्या प्रतिक्रिया
तब्बल 21 वर्षांनंतर महेश भट पुन्हा एकदा ‘सडक 2’ या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर वापसी करत आहेत. आलिया भट, पूजा भट, आदित्य राय कपूर आणि संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहेत. कालच या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज केले गेले. पण हे काय? हे पोस्टर पाहून नेटकरी भडकले आणि सोशल मीडियावर ‘बायकॉट सडक2’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. ‘सडक 2’वरचे मीम्सही व्हायरल झालेत.
its time to reject sadak2 #BoycottBollywoodFilms#BoycottSadak2#AliaBhattpic.twitter.com/WVX5vTUrMi
— sanskaripriya (@SanskariPriya) August 6, 2020
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिजमचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात सोशल मीडियावर मोहिम सुरु आहे. अशात ‘सडक 2’चे पोस्टर रिलीज होताच चाहत्यांच्या या मोहिमेला धार चढली. ‘सडक 2’ हा सिनेमा आजपर्यंतचा सर्वात नावडता सिनेमा बनावा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू,’ असे लिहित अनेकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
Hmari ladai sushant k Jane k bad bhi isi tarah chalti rahegi ...inki reality ko kbhi nhi Bhul a ja skta #BoycottSadak2#BoycottBollywoodFilms#DishaAndSSRHomicide
— S (@shubhiksha_111) August 6, 2020
‘बायकॉट सडक 2’ या हॅशटॅगखाली अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. ‘सुशांत गेला. पण आमची लढाई सुरु राहिल,’ असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने तर महेश भट, आलिया भट, मुकेश भट यांना धडा शिकवण्याची भाषा केली. ‘चला, यावेळी महेश भट, मुकेश भट आणि आलिया भट या सर्वांनाच धडा शिकवुया. आलिया व आदित्य घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेत. या चित्रपटाचा बहिष्कार करूया,’ असे एका युजरने कमेंट केली. काहींनी तर या चित्रपटाची तुलना चक्क 2020 मध्ये येणा-या आपत्तींशी केली. या ट्रोलिंगला कंटाळून आलियाने तिचे कमेंट सेक्शन बंद केले.
#Sadak2
— Deepak Yadav (@DeepakYadav_SSR) August 6, 2020
Guys lets make this trailer most disliked trailer ever
एकंदर काय तर प्रदर्शनाआधीच ‘सडक 2’ वादात सापडला. ‘सडक 2’ हा सिनेमा येत्या 28 तारखेला प्रदर्शित होणार आहे. अर्थात चित्रपटगृहात नाही तर डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर. हा सिनेमा ‘सडक’ या एकेकाळी गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल आहे.
"#AliaBhatt turned off comment section to avoid trolls"
— Arnab Mistry (@Arnab__Official) August 6, 2020
Le Me: #Sadak2pic.twitter.com/MR8EOITP0Y
#Sadak2
— Ritviz Tweeps⚡🚴 (@eklauta_) August 6, 2020
After seeing Sadak2 in trend..
Memers: pic.twitter.com/O0vDpR6Hr8
Me telling my friends to not watch #sadak2pic.twitter.com/Y7PebwRXIg
— Ajab Gajab™ (@Ajab__Gajab) August 6, 2020