Brahmastra च्या प्रमोशसाठी आलियाने केलं प्रेग्नंसीचं नाटक? रणबीरने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:04 PM2022-07-08T18:04:53+5:302022-07-08T18:05:46+5:30
Ranbir kapoor: रणबीर सध्या त्याच्या 'शमशेरा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आलियाच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं.
लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने अलिकडेच तिच्या प्रेग्नंसीची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफी करतानाचा एक फोटो शेअर केला. सोबतच लवकरच आम्ही आई-बाबा होतोय असं सांगणारं कॅप्शनही दिलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, काहींनी मात्र, त्यांना ट्रोल करत 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी हे सारं सुरु असल्याचं म्हटलं आहे. यावर आता रणबीरने मौन सोडलं आहे.
रणबीर सध्या त्याच्या 'शमशेरा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आलियाच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं. तसंच ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर दिलं.
"मला आणि आलियाला केवळ सगळ्यांसोबत आमचा आनंद वाटायचा होता. आलियाने मला इतकं प्रेम आणि आनंद दिलाय की कधी कधी माझ्याच मनात अपराधीपणाची भावना येते. मला बऱ्याचदा भीती वाटते हा आनंद माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना. त्यामुळे मला हे सारं काही सांभाळून ठेवायचं आहे. सध्याचा काळात आम्ही आमच्या नात्यातील आनंद उपभोगत आहोत", असं रणबीर म्हणाला.
पुढे तो म्हणतो, गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. पण, आता आम्ही खरंच आमच्या आयुष्याच्या एका नव्या पर्वाची मज्जा घेत आहोत." सध्या रणबीर त्याच्या आगामी शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, वाणी कपूर स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच या व्यतिरिक्त तो लवकरच ब्रह्मास्त्रमध्येही झळकणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.