Salman Khan : भाई, ये क्या बना डाला? सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चं नवं गाणं, नेटकऱ्यांंना हसू आवरेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 14:21 IST2023-04-19T14:19:19+5:302023-04-19T14:21:59+5:30
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan, Salman Khan : सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातील ‘लेट्स डान्स छोटू मोटू’ हे गाणं काल प्रदर्शित झालं. सलमानने या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आणि नेटकऱ्यांनी त्याची व गाण्याची खिल्ली उडवायला सुरूवात केली.

Salman Khan : भाई, ये क्या बना डाला? सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चं नवं गाणं, नेटकऱ्यांंना हसू आवरेना
सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ) या सिनेमाची रिलीज डेट जशी जशी जवळ येतेय, तसे धमाके सुरू आहेत. नुकतंच सलमानच्या या सिनेमाचं नवं गाणं रिलीज झालं. ‘लेट्स डान्स छोटू मोटू’ असे बोल असलेलं हे गाणं रिलीज झालं अन् सल्लू भाई नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. या सिनेमाचं टायटल मजेशीर आहेच. पण यापेक्षाही मजेशीर गोष्ट म्हणजे, या गाण्यात नर्सरी राईम्स ऐकायला मिळतात. यो यो हनी सिंगने यात रॅप करतोय आणि उर्वरित सगळे ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार… ” हे नर्सरी राइम्स गाताना आणि त्यावर थिरकताना दिसतात. सलमानने या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आणि नेटकऱ्यांनी त्याची व गाण्याची खिल्ली उडवायला सुरूवात केली.
ये क्या बना डाला, यार सल्लू भाई क्या क्या कर देते हो अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांंनी केल्या. “सलमान खानने चित्रपटात काम करणंच थांबवायला हवं. आता हे सहनशक्तीपलीकडे गेलंय,” अशी कमेंट एका युजरने केलं. “भावा, तुझं वय काय आणि या वयात हे काय करतोय” अशी कमेंट अन्य एका युजरने केली. “हा आता ठार वेडा झालाये,” अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. एकंदर काय तर गाणं आणि गाण्यात सलमानचा उथळपणा चाहत्यांना अजिबात भावला नाही. गाणं तर प्रेक्षकांनी नापसंत केलं, आता सिनेमा लोकांना किती आवडतो, ते बघूच.
सलमानचा हा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल, बॉक्सर विजेंदर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. साजिद नाडियादवाला याची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या २१ एप्रिलला रिलीज होतोय.