कंगनाला वैतागले लोक, आता ‘पंगा क्वीन’च्या ‘प्रकोपा’पासून वाचण्यासाठी लस शोधण्याची तयारी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 10:35 AM2021-02-07T10:35:54+5:302021-02-07T10:37:00+5:30

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत हिची टिवटिव सारखी सुरु असते. मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार आणि बोलणार...

people want vaccine to protect them from kangana ranaut know the reason | कंगनाला वैतागले लोक, आता ‘पंगा क्वीन’च्या ‘प्रकोपा’पासून वाचण्यासाठी लस शोधण्याची तयारी!!

कंगनाला वैतागले लोक, आता ‘पंगा क्वीन’च्या ‘प्रकोपा’पासून वाचण्यासाठी लस शोधण्याची तयारी!!

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडे कंगनाने स्वत:ला ‘क्वीन’ म्हटले होते.

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत हिची टिवटिव सारखी सुरु असते. मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार आणि बोलणार. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडवर निशाणा साधणारी कंगना सध्या शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आहेत.  शेतकरी आंदोलनाविरोधी भूमिका घेत, कंगनाने कधी शेतक-यांना ‘दहशतवादी’ ठरवले. यानंतर नथुराम गोडसे याचा फोटो ट्विट करत वाद निर्माण केला. कंगनाची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. पण आता अनेक लोक कंगनाच्या या ऊठसूट टिवटिवामुळे कंटाळले, वैतागले असल्याचे दिसतेय. आता तर कोरोनाप्रमाणेच कंगनापासून पिच्छा सोडवण्यासाठी एखादी लस शोधावी, असे लोकांना वाटतेय.

एका युजरने अशा आशयाचे ट्विट केल्यानंतर कंगनापासून लोक वैतागल्याचे स्पष्ट झाले. होय, ‘आम्हाला कंगनापासून वाचवण्यासाठी कोणी लस बनवतेय का?’ असे ट्विट या युजरने केले. सिंगर सोना मोहपात्राने हे ट्विट रिट्विट केल्यानंतर  या ट्विटने लगेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 


अलीकडे कंगनाने स्वत:ला ‘क्वीन’ म्हटले होते. काँग्रेस आमदार हरीशचंद्र मीणा यांनी कंगनाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘मी हैराण आहे. कंगनाजवळ अशी कोणती पात्रता आहे की, ती प्रत्येक मुद्यावर कमेंट करते  की ती फक्त सोशल मीडियावर एक मोहरा म्हणून काम करतेय. मी कंगनाची शैक्षणिक आणि राजकीय पात्रता जाणून घेऊ इच्छितो,’ अशा शब्दांत त्यांनी कंगनाला फटकारले होते. यावर उत्तर देताना कंगनाने स्वत:ला राणी म्हटले होते.
 ‘माझी पात्रता... तसे मी स्वत:ला सर्वसामान्य मानते. मात्र अनेक मूर्खांच्या गर्दीत सोशल मीडियावर लीड करण्यास मी बेस्ट आहे. तुम्हाला या राणीसमोर झुकण्याची गरज आहे,’ असे ट्विट कंगनाने केले होते.  

Web Title: people want vaccine to protect them from kangana ranaut know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.