'या' व्यक्तीने जान्हवी कपूरला दिली आईच्या मृत्यूची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 07:02 AM2018-02-26T07:02:16+5:302018-02-26T12:36:06+5:30
शनिवारी रात्री बॉलिवूडची चांदनी म्हणजेच श्रीदेवी यांचे निधन झाले. ५४ वर्षीय श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी येताच संपूर्ण देशातून हळहळ ...
श िवारी रात्री बॉलिवूडची चांदनी म्हणजेच श्रीदेवी यांचे निधन झाले. ५४ वर्षीय श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी येताच संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरला याचा सर्वात जास्त त्रास झाला आहे तिला आयुष्यभर हीच खंत राहील की ती शेवटच्या क्षणी तिच्या आई जवळ नव्हती. श्री देवी आणि बोनी कपूर आणि त्यांची लहान मुलगी खुशी मोहित मारवाह याच्या लग्नासाठी दुबईला गेले होते पण जान्हवी मात्र तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने ती दुबईला गेली नव्हती ती मुबंईमध्येच होती.
श्रीदेवींच्या निधनाची बातमी संपूर्ण देशभरात पसरली पण जान्हवी कपूरला ही बातमी देणारा व्यक्ती करण जोहर होता. सूत्रांनुसार करण जोहरला जेव्हा श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा तो लगेच तो बोनी कपूर यांच्या घरी गेला त्यांने जान्हवीला हि दुखद बातमी सांगितली आणि तिला घेऊऩ तो तिचे काका अनिल कपूर यांच्या घरी गेला.
श्रीदेवी यांनी जान्हवी कपूरच्या बॉलिवूड डेब्यूची जबाबदारी करण जोहरवर सोपवली होती. जुलै महिन्यात जान्हवीचा चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र त्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि पडद्यावर मुलीला पाहण्याची इच्छा अपुरी राहिली.
ALSO READ : ...मृत्यूपूर्वीची श्रीदेवी यांच्या आयुष्यातील 'ती' अखेरची 30 मिनिटं
जान्हवी धर्मा प्रोडक्शनच्या 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी श्रीदेवी यांना एका मुलाखतीत ह्याबद्दल विचारण्यात आला होता. तुमच्या मुलीची तुलना तुमच्याशी करण्यात येते आहे यावर काय सांगाला. श्रीदेवी म्हणाल्या होत्या की मला ह्याचीच खूप भीती वाटते जेव्हा माझ्या मुलीची तुलना माझ्याशी होते, पण ह्या सगळ्या गोष्टी होणार ह्याची मला कल्पना आहे म्हणून मी स्वतः ला आणि जान्हवीला यासाठी तयार करत आहे.
जान्हवीला बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यामागे श्रीदेवी यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. धर्मा प्रोडक्शन निर्मित धडक ह्या चित्रपटात जान्हवी बरोबर ईशान खट्टर आहे. श्रीदेवींना आपल्या मुलीच्या डेब्यूची फारच चिंता होती त्यांची इच्छा होती की जी जागा बॉलिवूडमध्ये त्यांना मिळाली आहे तिच त्यांच्या मुलीला ही मिळावी. यासाठी त्या प्रयत्नशील होत्या