शंकर महादवेन, प्रभूदेवासह 'या' व्यक्ति पद्म पुरस्काराने सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 02:35 PM2019-03-11T14:35:50+5:302019-03-11T14:48:54+5:30
आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध श्रेत्रात उल्लेखनिया कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंचा दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येतो.
आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध श्रेत्रात उल्लेखनिया कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंचा दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येतो. या वर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
Delhi: President Ram Nath Kovind confers Padma Shri award upon singer and music director Shankar Mahadevan. #PadmaAwardspic.twitter.com/DW5FOugQHl
— ANI (@ANI) 11 March 2019
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, अभिनेता- कोरियोग्राफर प्रभूदेवा यांच्यासह अनेक कलाकारांचा सन्मान राष्ट्रपती रामनाथ कोंविंद यांच्या हस्ते करण्यात आला.
या यादीत शिवमणी, एनसएसडीचे माजी संचालक आणि ज्येष्ठ दिग्दर्शक प्राचार्य वामन केंद्रेंचाही समावेश आहे. याचासोबत दक्षिणतले सुपरस्टार मोहनलाल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
#WATCH President Ram Nath Kovind confers Padma Shri award upon director and actor Prabhu Deva for the field of Art - Dance. #PadmaAwardspic.twitter.com/3wMttMuxIx
— ANI (@ANI) 11 March 2019
शंकर महादेवन पुरस्कार स्वीकारताना खूपच खूश दिसले. संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. कला आणि नृत्यक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी प्रभूदेवा यांना सन्मानित करण्यात आले.
Delhi: President Ram Nath Kovind confers Padma Bhushan award upon actor Mohanlal. #PadmaAwardspic.twitter.com/CFZejeale6
— ANI (@ANI) 11 March 2019
पद्मभूषण मिळाल्यानंतर अभिनेता मोहनलाल म्हणाले, हा खूप मोठा सन्मान आहे. एक व्यक्ति आणि अभिनेता म्हणून मला मिळालेला हा सर्वोच्च मान आहे. मी सिनेइंडस्ट्रीत गेली 41 वर्ष काम करतोय. त्यामुळे या पुरस्कारचे श्रेय मी माझ्या साथीदारांना आणि कुटुंबीयांना देतो. ज्यांनी या संपूर्ण प्रवासात मला साथ दिली.