सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा हा फोटो सोशल मीडियावर झालाय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:39 AM2019-04-14T11:39:33+5:302019-04-14T11:41:23+5:30
ऐश्वर्या आणि सलमान त्यांच्या आयुष्यात आज खूप पुढे गेले असले तरी त्यांच्या फॅन्सना त्यांची जोडी आजही आवडते. त्यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांसोबत अनेक वर्ष नात्यात होते. त्यांनी आपले नाते कधीच मिडियापासून लपवून ठेवले नाही. अनेक पार्टी, पुरस्कार सोहळ्यात देखील त्यांना एकत्र पाहायला मिळत असे. त्या दोघांनी संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटानंतर काहीच महिन्यात सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले.
ऐश्वर्या आणि सलमाने गेल्या कित्येक वर्षांत एकत्र काम केलेले नाहीये. ऐश्वर्याचे अभिषेक बच्चनसोबत लग्न झाले असून त्यांना आराध्या ही मुलगी आहे तर सलमान युलिया वंतूर सोबत नात्यात असल्याचे म्हटले जाते. ऐश्वर्या आणि सलमान त्यांच्या आयुष्यात आज खूप पुढे गेले असले तरी त्यांच्या फॅन्सना त्यांची जोडी आजही आवडते. त्यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोत ते दोघे एकदम चांगल्या मूडमध्ये दिसून येत आहेत. ते दोघे सोफ्यावर बसले असून ऐश्वर्याच्या हातात एक कप आहे. सलमान आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना त्यांचा हा फोटो चांगलाच आवडत आहे.
ऐश्वर्या आणि सलमानच्या ब्रेक अपची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. ऐश्वर्याने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते की, तो मला फोन करून काहीही बोलतो. माझ्या सहकाऱ्यांसोबत माझे प्रेम संबंध असल्याचा तो सतत संशय घेतो. त्याने अनेकवेळा माझ्यावर हात देखील उगारला आहे. पण माझे भाग्य चांगले असल्याने माझ्या शरीरावर कधी व्रण आले नाहीत. काहीच घडले नाही असे दाखवत मी त्यावेळी चित्रीकरणाला जात असे. याविषयी खुलासा देताना सलमानने सांगितले होते की, मी तिला कधीही मारले नाही. मी खूप भावुक व्हायचो आणि स्वतःला इजा करायचो. मी माझे डोके भिंतीवर आपटून घेईन, पण मी कधी कोणाला मारू शकत नाही.