Photo Viral : पहा करण जोहरच्या जुळ्या मुलांची पहिली झलक?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 10:09 AM2017-03-10T10:09:26+5:302017-03-10T15:40:49+5:30
दिग्दर्शक करण जोहर हा नुकताच सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचा सिंगल फादर बनला आहे. या मुलांमध्ये एक मुलगा आणि एक ...
द ग्दर्शक करण जोहर हा नुकताच सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचा सिंगल फादर बनला आहे. या मुलांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असून, त्यांची एक झलक बघण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. अशात गेल्या शुक्रवारपासून सोशल मीडियावर एका जुळ्या न्यू बोर्न बेबीजचे फोटो व्हायरल होत असल्याने, ते करण जोहरचेच मुलं असावेत, असा कयास लावला जात आहे. तसेच असे म्हटले जात आहे की, पहा करणच्या मुलांची पहिली झलक.
मात्र हे फोटो खरे की खोटे हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नसल्याने याविषयी एकप्रकारचं कोडं निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खानचा मुलगा तैमुरचा आई करिनासोबतचा असाच एक फोटो व्हायरल झाला होता. मात्र हा फोटो फेक असावा, असा कयास यूजर्सनी लावला होता. अखेर करिनानेच तिच्या सोशल हॅण्डलवर कम्फर्म केले होते की, फोटो तैमुरचाच आहे. अशात या जुळ्या मुलांचे फोटोही करणच्या मुलांचेच असावेत, असे बोलले जात आहे.
गेल्या ७ फेब्रुवारी रोजी अंधेरीच्या मसरानी हॉस्पिटलमध्ये करणच्या मुलांचा जन्म झाला होता. मात्र करणने बाप बनल्याची अनाउंसमेंट मार्चच्या पहिल्या आठवड्यात केली होती. शाहरूखचा मुलगा अबरामचा जन्मदेखील याच हॉस्पिटलमध्ये झाला होता. अबरामचा जन्म जून २०१३ मध्ये झाला होता. करणने ट्विटरवर एक स्टेटमेंट शेअर ‘रूही और यश’ माझ्या आयुष्यात आले असून, मी बाप बनलो आहे. मी वडील झाल्याने खूप आनंदी असून, मेडिकल सायन्सच्या चमत्काराचे आभार मानतो. तसेच बाप बनण्याअगोदर मी स्वत:ला मेंटली, फिजिकली आणि इमोशनली तयार केले होते. आता या जगात माझे मुलेच माझी प्रायोरिटी असल्याचे त्याने म्हटले होते.
दरम्यान, करण सध्या आनंदी असून, त्याच्या मुलांची झलक तो केव्हा दाखविणार याची मात्र सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. करण सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. अशात तो त्याच्या मुलांचे फोटोज् किंवा व्हिडिओ शेअर करण्याची शक्यता आहे. मात्र तो ते करणार हे मात्र सांगणे मुश्किल आहे. परंतु काहीही सध्या फिरत असलेल्या फोटोंवरून करणच्या मुलांची झलक पाहण्यास लोक किती आतुर झाले आहेत, हेच स्पष्ट होते.