जयपूरच्या सेटवरचे कंगना राणौतचे राणी लक्ष्मीबाईंच्या पेहरावातले फोटो व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 07:58 AM2017-11-01T07:58:11+5:302017-11-01T13:41:57+5:30
कंगना राणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग जयपूरच्या आमेर किल्ल्यामध्ये करते आहे. पहिल्यांदाच राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र समोर येणार आहे. ...
क गना राणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग जयपूरच्या आमेर किल्ल्यामध्ये करते आहे. पहिल्यांदाच राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र समोर येणार आहे. माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'मधला अभिनेत्री कंगना राणौतचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. ह्या चित्रपटात कंगना झांसीच्या राणीची म्हणजेच राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे. कंगनाचे जयपूरच्या सेटवरचे फोटो ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे.
हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित आहे. लेखक विजयेंद्र प्रसादने नुकतेच सांगितले की 'ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रपटात भरपूर युद्धचे दृश्य आहेत' याआधी लेखक विजयेंद्रने बाहुबली आणि बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटांची कथा लिहिली आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत.
यात बाई झलकारी बाईच्या भूमिकेत अंकिता लोखंडे दिसणार आहे. या चित्रपटातून अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईला पकडले व फासावर लटकवले होते. यात अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. वैभव हीच भूमिका साकारणार आहे. कंगनाचे फॅन्स या चित्रपटाची वाट मोठ्या आतुरतेने बघतायेत.
ALSO REDA : कंगना राणौतचे ‘ते’ फोटो लीक झाले नव्हते तर लीक केले गेले होते! वाचा एक आतली बातमी!!
तुम्ही पाहू शकता कंगना या फोटोमध्ये तालावर कमरेला बांधून उभी दिसते आहे. यात तिने संपूर्ण पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. डोक्याला साफा देखील बांधला आहे. तसेच तिने अंगावर सुंदर दागिनेसुद्धा परिधान केले आहेत. कंगनाच्या लूकचे वैशिष्ट्य म्हणजे तिने नाकात मराठमोळ्या पद्धधतीची नथ सुद्धा घातली आहे.All hail the Queen! #KanganaRanaut spotted in Jaipur while she was shooting for #Manikarnika - The Queen of Jhansi! pic.twitter.com/F4SDrjJeAn— Team Kangana Ranaut (@KanganaFanClub) October 31, 2017