अक्षय कुमार व राधिका आपटेचे ​‘पॅडमॅन’च्या सेटवरचे फोटो LEAKED!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 06:40 AM2017-03-17T06:40:14+5:302017-03-17T12:10:14+5:30

अक्षय कुमारने नुकतेच ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे शूटींग सुरू केले. अर्थात शूटींग सुरु होऊन काही दिवस होत नाही तोच हा ...

Photos of Akshay Kumar and Radhika Apte's 'Padman' set are leaked! | अक्षय कुमार व राधिका आपटेचे ​‘पॅडमॅन’च्या सेटवरचे फोटो LEAKED!

अक्षय कुमार व राधिका आपटेचे ​‘पॅडमॅन’च्या सेटवरचे फोटो LEAKED!

googlenewsNext
्षय कुमारने नुकतेच ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे शूटींग सुरू केले. अर्थात शूटींग सुरु होऊन काही दिवस होत नाही तोच हा चित्रपट चर्चेस आला आहे. होय, चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो लीक झाले आहेत.





इंदूरच्या महेश्वर येथील एका रोमॅन्टिक गाण्याचे शूटींग सुरु करतानाचे अक्षय व राधिका आपटे हिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटात राधिका आपटे  अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारते आहे. महेश्वर येथील अनेक सुंदर लोकेशन्सवर अक्षय व राधिका दिसत आहे. या फोटोंमध्ये अक्षयने पांढºया रंगाचा शर्ट घातलेला आहे तर राधिका साडीत आहे. राधिका अक्षयच्या सायकलवर पुढे बसलेली आहे.



राधिकाशिवाय सोनम कपूर ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापही निश्चित झाली नसली तरीही चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मात्र कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बल्की करीत असून, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. अलीकडे अक्षयने ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे शूटींग संपवले. यानंतर तो ‘पॅडमॅन’मध्ये बिझी झाला. हा चित्रपट संपताच ‘जॉली एलएलबी2’ फेम दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्या एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे

ALSO READ : काय आहे अक्षय कुमारचे रोजचे वेळापत्रक... जाणून घ्या आमच्यासोबत...

‘मोगल’.  हा  चित्रपट गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटाची निर्मितीदेखील गुलशन कुमार यांचीच कंपनी टी-सीरिज करणार आहे. अक्षय या चित्रपटात गुलशन कुमार यांच्या व्यक्तिरेखेत  पाहायला मिळणार आहे.  अंधेरीतील एका मंदिराच्या बाहेर गुलशन कुमार यांची भर दिवसा हत्या झाली होती. गुलशन कुमार यांचे प्रतिस्पर्धी संगीतकार नदीम हे या हत्येत आरोपी होते. या हत्येमुळे कशाप्रकारे व्यवसायिक, सेलिब्रेटी यांना खंडणीसाठी अंडरवर्ल्डकडून धमक्या दिल्या जात आहेत, हे समोर आले होते. आता हा सगळा घटनाक्रम अक्षयच्या चित्रपटात दिसणे अपेक्षित आहे.

Web Title: Photos of Akshay Kumar and Radhika Apte's 'Padman' set are leaked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.