अनुष्का शर्माचे वोग मासिकासाठी फोटोसेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2017 12:54 PM2017-02-26T12:54:36+5:302017-02-26T18:24:36+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही चांगलीच चर्चेत असल्याची पाहायला मिळत आहे. एकीकडे विराट कोहलीच प्रेम प्रकरण तर दुसरीकडे तिचा आगामी ...

Photoshop for Anushka Sharma's Vogue Magazine | अनुष्का शर्माचे वोग मासिकासाठी फोटोसेशन

अनुष्का शर्माचे वोग मासिकासाठी फोटोसेशन

googlenewsNext
िनेत्री अनुष्का शर्मा ही चांगलीच चर्चेत असल्याची पाहायला मिळत आहे. एकीकडे विराट कोहलीच प्रेम प्रकरण तर दुसरीकडे तिचा आगामी  चित्रपट फिल्लौरीमुळे. त्याचबरोबर ती आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असल्याची पाहायला मिळत आहे. कारण तिने नुकतेच वोग इंडिया मासिकासाठी फोटोशुट केले आहे. वोग इंडिया मासिकाच्या मार्चच्या अंकामध्ये अनुष्का शर्मा मुखपृष्ठावर झळकणार आहे. यासाठी तिने पांढरा टी- शर्ट आणि काळ्या स्कर्टमध्ये फोटोशुट केले आहे. या फोटोतील अनुष्काची अदा लक्षवेधी अशीच आहे. अनुष्का शर्माने ट्विटरवरुन तिचा फोटो शेअर केला असून या महिन्यात वोग इंडिया..असे कॅप्शनही तिने दिले आहे.
   
      या फोटोशुटसाठी तिची स्टाइल अनैता अदजानिया, केशरचना गैब्रिअल जिओगियो आणि मेकअप अनिल चिनप्पा यांनी केला आहे. बोल्ड अवतारामध्ये दिसणारी अनुष्का या फोटोमध्ये एका वेगळ्या अंदाजात लक्षवेधून घेताना दिसते. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्या मुख्य भूमिका असणाºया फिल्लौरी या चित्रपटाची सध्या बॉलिवूड वतुर्ळात चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षक आणि समीक्षकांनी अनुष्काच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रेलरमागोमाग सध्या या चित्रपटाचे पोस्टरही चर्चेत आहे. अनुष्का आणि दिलजितच्या लूकपासून ते अगदी या चित्रपटाच्या हटके कथानकाविषयी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामुळे सध्या या चित्रपटाबरोबरच या गाण्यांची चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे. 


Web Title: Photoshop for Anushka Sharma's Vogue Magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.