या कारणामुळे आलिशान बंगला सोडून रणबीर दीपिका राहतात फ्लॅटमध्ये, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचा Inside View

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 03:08 PM2020-09-29T15:08:47+5:302020-09-29T15:09:22+5:30

कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. अशाच एका बड्या आणि स्टार कलाकाराच्या घराबाबत आपण जाणून घेणार आहोत. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि बॉलीवुडचा बाजीराव रणबीर सिंग मुंबईत आलिशान घरात राहतात.

pictures and videos that take you inside Ranveer Singh & Deepika Padukone’s luxurious home in Mumbai | या कारणामुळे आलिशान बंगला सोडून रणबीर दीपिका राहतात फ्लॅटमध्ये, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचा Inside View

या कारणामुळे आलिशान बंगला सोडून रणबीर दीपिका राहतात फ्लॅटमध्ये, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचा Inside View

googlenewsNext

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. अशाच एका बड्या आणि स्टार कलाकाराच्या घराबाबत आपण जाणून घेणार आहोत. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि बॉलीवुडचा बाजीराव रणबीर सिंग मुंबईत आलिशान घरात राहतात हे सा-यांनाच माहिती आहे. 

रणबीरने खास दीपिकासाठी लग्नाआधी जुहूमध्ये आलिशान बंगला खरेदी केला होता. बंगल्याची किंमत 50 कोटी असल्याचे सांगितले जात होते. बंगल्याचे बांधकामाचे काम पूर्ण झाले नव्हते. दीपिका याच बंगल्यात तिच्या सासरच्या म्हणजेच रणवीर सिंगच्या कुटुंबासह राहणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र दीपिकाने लग्नानंतरही प्रभादेवी इथल्याच फ्लॅटमध्ये राहणे पसंत केले. 


तिच्या घरात मोठी बाल्कनी असून यांत तिने तिच्या आवडीनुसार गार्डनप्रमाणेच सजवले आहे. आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी दोघांनीही बरीच मेहनत घेतली आहे. या घराच्या फर्निचरची शॉपिंगपासून ते गार्डन सजवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी दोघांनी मिळून केल्या आहेत.

याशिवाय विविध देशात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या दीपिका रणबीरने तिथून खरेदी केलेल्या वस्तूही त्याच्या घरात पाहायला मिळत आहेत. घराच्या भिंतीवरही सुंदर पेटींग लावल्याचे पाहायला मिळते. घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी दीपिकाने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.


लॉकडाऊनच्या काळात रणवीरसोबत राहणे सर्वात सोपे आहे, कारण तो 20 तास झोपतो. ज्यामुळे मला सर्व काही करण्याची संधी मिळतेय. जेव्हा तो चार तासांसाठी उठतो, तेव्हा आम्ही एकत्र खातो, चित्रपट पाहतो आणि व्यायाम करतो. या वेळी त्याच्याबरोबर वेळ घालवणे सर्वात आनंददायक आहे, तो खूप साधाभोळा नवरा आहे. इटॅलियन आणि कॉन्टिनेन्टल खाद्यपदार्थ मी चांगले बनवते. याकाळात माझी स्वयंपाक शिकण्याची इच्छाही मी पूर्ण केली. छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यात खूप मदतही झाली असे तिने सांगितले होते.
 

Web Title: pictures and videos that take you inside Ranveer Singh & Deepika Padukone’s luxurious home in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.