पहलाज निहलानी पुन्हा वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:13 AM2016-01-16T01:13:33+5:302016-02-07T13:39:19+5:30

या चित्रफीतीत दाखविण्यात आलेल्या छायाचित्रावरुन एक वाद आहे. ते छायाचित्र विदेशी संस्थांकडून घेऊ न भारतीय असल्याचे दाखविण्यात आले आहेत. ...

Piyaz Nihalani again promised | पहलाज निहलानी पुन्हा वादात

पहलाज निहलानी पुन्हा वादात

googlenewsNext
चित्रफीतीत दाखविण्यात आलेल्या छायाचित्रावरुन एक वाद आहे. ते छायाचित्र विदेशी संस्थांकडून घेऊ न भारतीय असल्याचे दाखविण्यात आले आहेत. याशिवाय एक प्रश्नदेखील समोर येत आहे की, सेंसर बोर्डच्या चेअरमन पदावर पहलाज निहलानी कार्यरत असताना याप्रकारची चित्रफीत बनवून एका चित्रपटाशी जोडण्याचा अधिकार त्यांना खरच आहे का? या दोन्ही प्रश्नांना पहलाज यांनी उत्तर तर दिले आहे, मात्र तरीदेखील वाद सुरूच आहेत.
याच्या अगोदर सेंसर बोर्डच्या चेअरमन पदाच्या निवडीवरुनही प्रश्न निर्माण झाले होते. यावर्षी १९ जानेवारीला या पदावर आल्यापासून त्यांना विरोध होत आहे. काही चित्रपटकर्त्यांनी त्यांना पदावरुन काढण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला आहे, मात्र पहलाज आपल्या पदावर कसेतरी टिकून आहेत. निहलानी यांचा आणि वादांचे नाते तसे जुनेच आहे. १९९0 मध्ये आलेला आँखे हा चित्रपट एक करार समजण्यात आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भव्य आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सुनील शेट्टी मीडियापर्यंत पोहचून त्याला एक नवी ओळख मिळाली. पहलाजांच्या या चित्रपटाची अजून मुहूर्तमेढ रोवली गेली नाही. सुनील शेट्टींच्या करिअरची वाटचाल मात्र सुरू झाली.
९0 च्या दशकात पहलाज यांनी अमिताभ बच्चन सोबत दोनदा चित्रपट काढण्याचा मोठा प्रयत्न केला. मात्र विविध कारणांनी अपयश येत गेले. या दोन्ही चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत मोठय़ा कलाकरांना जोडण्याचा प्रयत्न करणात आला होता. अगोदर पहलाज निहलानी यांनी अमिताभ बच्चन व जानी राजकुमार यांना सोबत आणण्याचा प्रयत्न केला. पहलाजने २0१२ मध्ये पुन्हा एक चित्रपट सुरू केला. ज्याच्यात आपला लाडका नायक गोविंदाला मोठय़ा कालावधीनंतर संधी दिली. गोविंदा जेव्हा चित्रपट मिळविण्यासाठी संघर्ष करीत होता नेमके त्याचवेळी पहलाजने संधी दिली. गोविंदानंतर शत्रुघ्न सिन्हाला देखील संधी दिली, मात्र आता हे चित्रपट प्रदर्शित होतील याची शक्यता वाटत नाही आणि विशेष म्हणजे, पहलाज याविषयी काही बोलण्यासही तयार नाहीत. चित्रपट दिग्दर्शक पहलाज निहलानी पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात आहेत. यावेळी पंतप्रधांच्या सर्मथनासाठी बनविण्यात आलेल्या नव्या चित्रफीतीमुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. या चित्रफीतीत वेगवेगळ्या धर्माचे तरुण मोदीचा जयजयकार करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मागील सप्ताहात दिवाळीनिमित्त प्रदर्शित झालेल्या प्रेम रतन धन पायोच्या मध्यांतरानंतर सहा मिनिटांची ही चित्रफीत दाखविण्यात येत आहे, मात्र यावरुन वाद उद्भवत आहेत.

Web Title: Piyaz Nihalani again promised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.