व्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 12:59 PM2018-11-17T12:59:08+5:302018-11-17T13:04:06+5:30

सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी सिनेमा 2.0ला घेऊन चर्चेत आहे. हा सिनेमा याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स फारच उत्सुक आहेत

To play the role of the villain, Akshay Kumar has made so many hours of make-up | व्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर

व्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर

googlenewsNext
ठळक मुद्देरजनीकांत आणि अक्षय कुमार दोघे ही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेतयातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर 544 कोटी रूपये खर्च केले गेले आहेत

सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी सिनेमा 2.0ला घेऊन चर्चेत आहे. हा सिनेमा याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स फारच उत्सुक आहेत.  रजनीकांत आणि अक्षय कुमार दोघे ही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला त्यानंतर आता मेकिंग व्हिडिओ समोर आला आहे. मेकिंग व्हिडिओ पाहताना तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. अक्षयकुमार हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



 


व्हिलेनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय तब्बल तिने 3 मेकअप करायचा. त्यानंतर मेकअप काढायला जवळपास अडीच तास लागायचे. मेकअप केल्यानंतर अक्षय स्वत:ला बघून हैराण व्हायचा. 


या सिनेमात जबरदस्त  ग्राफिक्सचा उपयोग करण्यात आलेला आहे. यातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर 544 कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. सिनेमाच्या व्हिएफएक्सवर 544 कोटी रूपये खर्च झालेत. सिनेमा बनवण्यासाठी 3 हजारांवर टेक्निशियनची मदत घेतली गेली आहे. निश्चितपणे भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा एक व्रिकम आहे. आजपर्यंत कुठल्याही सिनेमाच्या व्हिएफएक्सवर इतका खर्च केला गेलेला नाही. त्यामुळे ‘2.0’ या सिनेमाला भारतातील सर्वात महागडा सिनेमा म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपट 3-डीमध्ये शूट केला गेला. हे ही भारतात पहिल्यांदाच झाले आहे. 29 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: To play the role of the villain, Akshay Kumar has made so many hours of make-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.