Bombay Jayashri: प्रसिद्ध गायिका हॉटेलच्या खोलीत पडली बेशुद्ध, डॉक्टरांना केली शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 12:01 PM2023-03-25T12:01:32+5:302023-03-25T12:03:08+5:30
हॉटेलच्या खोलीत त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
Bombay Jayashri: ज्येष्ठ कर्नाटकी गायिका आणि पार्श्वगायिका बॉम्बे जयश्री नुकत्याच युनायटेड किंगडममधील लिव्हरपूल येथील हॉटेलच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. रिपोर्टनुसार पद्मश्री पुरस्कार विजेती जयश्री लोकप्रिय गायकांसोबत ब्रिटनच्या दौऱ्यावर होत्या. त्यांचा ब्रेन हॅमरेज झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे त्या हॉटेलच्या खोलीत बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना ताबडतोब लिव्हरपूलमधल्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. लेटेस्ट अपडेटनुसार जयश्री यांच्यावरील धोका आता टळला आहे.
कुटुंबाने दिली हेल्थ अपडेट
जयश्री यांच्या कुटुंबाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर त्यांच्या आरोग्याबाबतचे अधिकृत पोस्ट शेअर केली आहे.ज्यामध्ये लिहिले आहे की, "बॉम्बे जयश्री यांची प्रकृती युनायटेड किंगडममध्ये बिघडली आहे, त्या त्यांच्या म्युझिक कॉन्सर्टसाठी तिथे गेल्या आहे. NHS स्टाफ आणि त्यांच्या सहकारी कलाकारांचे आभार, त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांन आता काही दिवस विश्रांतीची गरज आहे.
बॉम्बे जयश्री यांना नुकताच संगीत अकादमीतर्फे प्रतिष्ठित संगीता कलानिधीने सन्मानित करण्यात आले. त्या एक अतिशय प्रसिद्ध गायिका आहेत आणि त्यांनी तमिळ, मल्याळम, तेलगू आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. जयश्री शुक्रवारी 24 मार्च रोजी संध्याकाळी लिव्हरपूल युनिव्हर्सिटीच्या तुंग ऑडिटोरियम योको ओनो लेनन सेंटरमध्ये परफॉर्म करणार होत्या परंतु त्यापूर्वीच तिची प्रकृती बिघडली. लेटेस्ट रिपोर्टनुसार, जयश्री यांचं कुटुंबीय त्यांना पुढील उपचारांसाठी काही दिवसांत चेन्नईला परत आणण्याचा विचार करत आहेत.