'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाल्याबद्दल मोदींकडून कौतुक, म्हणाले 'संपूर्ण देशाला अभिमान वाटला'!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 01:55 PM2023-01-11T13:55:46+5:302023-01-11T13:57:36+5:30

एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजिनल सॉंगचा अवॉर्ड मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण 'RRR'च्या टीमचं ट्विट करत कौतुक केलं आहे.

Pm modi congratulates rrr team winning best original song award naatu naatu golden globes | 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाल्याबद्दल मोदींकडून कौतुक, म्हणाले 'संपूर्ण देशाला अभिमान वाटला'!

'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाल्याबद्दल मोदींकडून कौतुक, म्हणाले 'संपूर्ण देशाला अभिमान वाटला'!

googlenewsNext

एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमाने इतिहास रचला आहे. या सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजिनल सॉंगचा अवॉर्ड मिळाला. जशी याची घोषणा झाली तिथे असलेल्या राजामौली, रामचरण आणि जूनियर एनटीआर यांनी एकच जल्लोष केला. या गाण्याच्या यशाचं श्रेय जेवढं जूनियर एनटीआर,  रामचरण आणि राजामौली यांना जातं, ते तेवढंच कोरिओग्राफर प्रेम रक्षित (Prem Rakshit) यालाही जातं. साऊथ इंडस्ट्री ते बॉलिवूडपर्यंत जल्लोषाचे वातावरण असून सर्व सेलिब्रिटी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आहेत. 'आरआरआर'च्या या यशाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी ही आनंद व्यक्त केला असून टीमचे अभिनंदनही केले आहे.

पीएम नरेंद्र मोदी यांनी केलं ट्विट
पीएम मोदींनी ट्विटमध्ये लिहिले, “एक अतिशय खास कामगिरी! @mmkeeravaani, प्रेम रक्षित, काल भैरव, चंद्र बोस, @Rahulsipligunj. मी @ssrajamouli, @taarak 9999, @AlwaysRamCharan आणि @RRRMovie च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. या प्रतिष्ठित पुरस्काराचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू’ हे गाणे 2022 च्या हिट गाण्यांपैकी एक आहे. गाण्याची तेलुगू आवृत्ती ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी कंपोज केली होती. काला भैरवा आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे हिट गाणं लिहिलेय. 2023 च्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा 12 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली होती.

नाटू नाटू गाण्याचं शूटींग यूक्रेनमध्ये झालं होतं. कारण त्यावेळी भारतात लॉकडाऊन लागला होता. या गाण्यासोबतच काही सीन्सचंही शूटींग तिथेच करण्यात आलं. 'नाटू नाटू' गाणं यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांच्या महालात शूट करण्यात आलं होतं. रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआर ने या गाण्याची एक महिला रिहर्सल केली होती. तर गाण्याचं शूट 2 आठवड्यांमध्ये करण्यात आलं.
 

Web Title: Pm modi congratulates rrr team winning best original song award naatu naatu golden globes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.