"जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्या व्यक्तीच्या निधनानंतर..."; सतीश कौशिक यांच्या पत्नी झाल्या भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 05:48 PM2023-03-18T17:48:23+5:302023-03-18T17:48:43+5:30

PM नरेंद्र मोदींनी विशेष पत्र पाठवून सतीश कौशिक यांच्या कुटुंबीयांचे केलं सांत्वन

PM Narendra modi sent letter of condolence to satish kaushik wife shashi anupam kher tweet back with grattitude | "जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्या व्यक्तीच्या निधनानंतर..."; सतीश कौशिक यांच्या पत्नी झाल्या भावूक

"जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्या व्यक्तीच्या निधनानंतर..."; सतीश कौशिक यांच्या पत्नी झाल्या भावूक

googlenewsNext

Pm Modi, Satish Kaushik: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करणारे एक पत्र पाठवले होते, जे अनुपम खेर यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आणि सतीश कौशिक यांची पत्नी शशी यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. पीएम मोदींनी पत्रात लिहिले आहे की, या कठीण काळात सतीश कौशिक यांच्या कुटुंबाप्रति आणि हितचिंतकांसोबत त्यांच्या सहवेदना ­आहेत. त्यावर शशी यांनी कृतज्ञता व्यक्त करताना लिहिले आहे की, आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर जेव्हा देशाचे पंतप्रधान सांत्वन करतात आणि धीर देतात तेव्हा त्या दु:खाला सामोरे जाण्याचे बळ मिळते!

सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करताना अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले पत्र शेअर केले आणि शशी कौशिक यांच्या वतीने कॅप्शनमध्ये लिहिले, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. या वाईट आणि दु:खाच्या प्रसंगी तुमचे संवेदनशील पत्र माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी एखाद्या जखमेवरील मलमाप्रमाणे आहे! एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जाण्यावर देशाचे पंतप्रधान सांत्वन आणि धीर देतात, तेव्हा त्या दु:खाला सामोरे जाण्याचे बळ मिळते. माझ्या वतीने, आमची मुलगी वंशिका, आमचे संपूर्ण कुटुंब आणि सतीशजींच्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो. आणि तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते- शशी कौशिक."

पत्रात पंतप्रधान मोदींनी लिहिले, "सतीश कौशिक जी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. या कठीण काळात माझ्या सहवेदना कुटुंबीय आणि शुभचिंतकांसोबत आहेत. अष्टपैलुत्वाने समृद्ध, सतीश कौशिक जी यांनी त्यांच्या अप्रतिम सर्जनशीलतेने सिनेविश्व समृद्ध केले. एक कुशल लेखक, उत्कट अभिनेता, यशस्वी निर्माता आणि प्रभावशाली दिग्दर्शक या नात्याने चित्रपटसृष्टीच्या अनेक पैलूंमध्ये त्यांचे काम अतुलनीय आहे. आपल्या समर्पण आणि परिश्रमाने एक विशेष ओळख निर्माण करणारे सतीश कौशिक जी यांनी साकारलेली विविध पात्रे प्रेक्षकांच्या हृदयात नेहमीच गोड आठवणीप्रमाणे राहतील. विनोदी कलाकार म्हणूनही त्यांनी प्रेक्षकांची भरभरून वाहवा मिळवली. त्यांच्या निधनाने चित्रपट जगताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. सतीश कौशिक जी कुटुंबासाठी एक मजबूत आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान होते. त्यांच्या मृत्यूमुळे तुमच्या जीवनात निर्माण झालेल्या पोकळीची वेदना शब्दांत व्यक्त करता येत नाही. आज ते या जगात नाहीत, पण त्यांच्याशी निगडीत आठवणी आणि जीवनमूल्ये कुटुंबासोबत राहतील. मी देवाकडे प्रार्थना करतो की, शोकाकुल कुटुंबीयांना आणि हितचिंतकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती आणि धीर देवो. ओम शांती."

अभिनेता आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबईत आणून वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश यांने 1985 मध्ये शशी कौशिक यांच्याशी लग्न केले. 1996 मध्ये त्यांच्या 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. यानंतर 2012 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलगी वंशिकाचा जन्म झाला.

सतीश शेवटचा 'छत्रीवाली'मध्ये दिसला होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पॉप कौन' या वेबसिरीजमध्येही तो आहे. त्याचा शेवटचा सिनेमा 'इमर्जन्सी' असेल, ज्यामध्ये तो कंगना राणौतसोबत दिसणार आहे. या चित्रपटात त्यांनी राजकारणी जगजीवन राम यांची भूमिका साकारली होती.

Web Title: PM Narendra modi sent letter of condolence to satish kaushik wife shashi anupam kher tweet back with grattitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.