अजय देवगणचा हा व्हिडीओ पाहून मोदी म्हणाले शाब्बास...! एकदा पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 11:03 AM2020-04-23T11:03:48+5:302020-04-23T11:04:17+5:30

कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. पण बॉलिवूडचा ‘सिंगम’ अजय देवगणला मात्र पर्सनल बॉडीगार्ड मिळाला आहे.

pm narendra modi thanked ajay devgn for his video to promote the aarogya setu app-ram | अजय देवगणचा हा व्हिडीओ पाहून मोदी म्हणाले शाब्बास...! एकदा पाहाच!!

अजय देवगणचा हा व्हिडीओ पाहून मोदी म्हणाले शाब्बास...! एकदा पाहाच!!

googlenewsNext
ठळक मुद्दे हा व्हिडीओ शेअर करताना अजयने अमिताभ बच्चन, सलमान खान, काजोल, अक्षय कुमार, रणवीर सिंग आदींना टॅग केले आहे.

कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. पण बॉलिवूडचा ‘सिंगम’ अजय देवगणला मात्र पर्सनल बॉडीगार्ड मिळाला आहे. त्याच्या या नव्या बॉडीगार्डचे नाव आहे सेतू. अजयने आपल्या या नव्या बॉडीगार्डचा एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे, पीएम नरेंद्र मोदी यांनीही अजयच्या या व्हिडीओची प्रशंसा केली आहे.
आता हा संपूर्ण मामला काय ते जाणून घेऊ यात. तर  या व्हिडीओत अजयचा बॉडीगार्ड दुसरा कुणी नसून खुद्द अजय आहे. 

हा व्हिडीओ नेमका आहे तो आरोग्य सेतू अ‍ॅपचा. होय, सरकारने भारतातील 130 कोटी जनतेची सुरक्षा लक्षात घेता हे अ‍ॅप बनवले आहे.  कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका व जोखिम याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे अ‍ॅप तयार करण्यात आले  आहे.  हे अँप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरसबाबतच्या धोक्यापासून अलर्ट करेल आणि तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात की नाही हे सांगते. अजयने आपल्या व्हिडीओत या अ‍ॅपचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
‘कोरोनाविरूद्धच्या लढ्यात प्रत्येक भारतीयाला स्वत:चा पर्सनल बॉडीगार्ड दिल्याबद्दल पीएम नरेन्द्र मोदींचे आभार. सेतू माझा बॉडीगार्ड आहे आणि तुमचाही़ आत्ताच डाऊनलोड करा, ’ असे हा व्हिडीओ शेअर करताना अजयने लिहिले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अजयने अमिताभ बच्चन, सलमान खान, काजोल, अक्षय कुमार, रणवीर सिंग आदींना टॅग केले आहे.

मोदींनी केले कौतुक

अजयचा हा व्हिडीओ पाहून नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले. खूप छान अजय देवगण, अशा शब्दांत त्यांनी अजयची पाठ थोपटली.

Web Title: pm narendra modi thanked ajay devgn for his video to promote the aarogya setu app-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.