केआरकेच्या घरी पोहोचले पोलीस; कधीही होऊ शकते अटक !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 04:12 PM2017-11-03T16:12:19+5:302017-11-03T21:42:19+5:30

अशी बातमी समोर येत आहे की, स्वत:ला सर्वात मोठा फिल्म क्रिटिक समजणाºया केआरके ऊर्फ कमाल राशिद खानच्या घरी सध्या ...

Police reached KKK's house; Can never be arrested! | केआरकेच्या घरी पोहोचले पोलीस; कधीही होऊ शकते अटक !

केआरकेच्या घरी पोहोचले पोलीस; कधीही होऊ शकते अटक !

googlenewsNext
ी बातमी समोर येत आहे की, स्वत:ला सर्वात मोठा फिल्म क्रिटिक समजणाºया केआरके ऊर्फ कमाल राशिद खानच्या घरी सध्या पोलीस पोहोचले आहेत. त्यामुळे त्याला केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. काही तासांपूर्वीच केआरकेने एक प्रेस रिलीज प्रसिद्ध करून म्हटले होते की, जर पुढच्या पंधरा दिवसांच्या आत माझे ट्विटर अकाउंट सुरू केले नाही तर मी आत्महत्या करणार. जेव्हा ही माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी थेट केआरकेचा बंगला गाठून त्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

विशेष म्हणजे, पोलिसांबाबतची माहिती केआरकेनेच त्याच्या बॉक्स आॅफिस ट्विटर अकाउंटवर दिली आहे. केआरकेने लिहिले की, ‘पोलीस माझ्या बंगल्यावर पोहोचले आहेत. ते पुढील दुर्घटना होऊ नये याकरिताच माझ्याकडे आले आहेत.’ आता हे प्रकरण कुठल्या कारणाने सुरू झाले कदाचित तुम्हाला माहिती असेलच. त्याचे झाले असे की, आमीर खान आणि जायरा वसीमचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ रिलीज होण्याअगोदरच केआरकेने बघितला होता. शिवाय त्याने नेहमीप्रमाणे चित्रपटाचा रिव्ह्यूदेखील अपलोड केला. विशेष म्हणजे, केआरकेने चित्रपटाचा क्लायमॅक्सदेखील लीक केला. त्यामुळे त्याचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले. 

आता ट्विटर अकाउंटच बंद केल्याने केआरकेकडे कुठलेही काम उरले नाही. कारण आता जेव्हापासून ट्विटर बंद झाले तेव्हापासून त्याच्याभोवती निर्माण होणारा वादही थांबला. त्यामुळे त्याचे ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू केले जावे यासाठी त्याची धडपड सुरू झाली आहे. खरं तर केआरकेच्या ट्विटमुळे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्रस्त होती. कारण तो कोणावरही वादग्रस्त ट्विट करून वाद निर्माण करीत होता. आता त्याचे अकाउंट बंद झाल्याने बॉलिवूडकरांमध्ये समाधान व्यक्त केले जात नसेल तरच नवल. 

Web Title: Police reached KKK's house; Can never be arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.