'सुशांत मृत्यू प्रकरणात राजकीय स्वार्थ', रियावरील आरोपांचे सतीश मानेशिंदेंनी केले खंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 09:11 PM2020-09-02T21:11:37+5:302020-09-02T21:12:17+5:30
सुशांतच्या कुटुंबावर रियाच्या वकिलांनी गंभीर आरोप केलेत. त्यांनी रियाला या प्रकरणात नाहक गुंतवत असल्याचे म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी त्याची गर्लफ्रेंड म्हणजेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर केलेल्या आरोपांचे तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की, सुशांतच्या कुटुंबाने पाटण्यात पोलिसांना खोटा जबाब दिला आहे आणि रियावरील आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडी आणि एनसीबी करत आहे. सीबीआय अधिकारीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, सुशांत सिंग राजपूतची हत्या झाल्याचा अद्याप एकही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. ते आत्महत्येच्या अँगेलने सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच आत्महत्येला कुणी प्रवृत्त केले का, याचा देखील तपास करत आहेत. दरम्यान आता रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी नुकतेच न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत रियावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
वकील मानेशिंदे यांनी सांगितले, रिया, शोविक दोघेही ड्रग्ज घेत नव्हते. त्यांच्या नार्कोटिक्स टेस्टलाही सहमती असेल. सुशांत स्वत: ड्रग्ज घ्यायचा. तो आधी मिरंडामार्फत ड्रग्ज मागवायचा. मात्र लॉकडाऊनमध्ये मिरंडा नव्हता तेव्हा त्याने रिया आणि शोविकमार्फत ड्रग्ज मागवले होते. रिया आणि शोविकला यासाठी मेसेज पाठवायला सांगायचा. या प्रकरणात ड्रग्जचा काहीही संबंध नाही.
सुशांतचे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे. बिहारची निवडणूक नसती तर या प्रकरणात इतके काही झाले नसते. एका दिवसात बिहारकडून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. अनेक प्रकरणात इतक्या कमी वेळेत सीबीआयकडे प्रकरण सोपविले जात नाही आणि सीबीआयही प्रकरण इतक्या लवकर घेत नाही. महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिसांचे काहीही चुकले नाही. रियावरील इतर आरोप किरकोळ आहेत. तिला गुंतवण्याच्या हेतूने करण्यात आलेत, वेळ येताच आम्ही हे सिद्ध करून दाखवू.
NCBचा कारवाईचा धडाका! शोविकचे ड्रगसंबंधी चॅट आले समोर, सात तस्करांना अटक
सतीश मानेशिंदे पुढे म्हणाले, 8 जूनला सुशांतला त्याच्या दिल्लीतील बहिणीकडून तिने दिलेले औषध घेण्याबाबत सतत मेसेज येत होते. या औषधांचे प्रिस्क्रिप्शनही नव्हते. यावरून एखाद्या जोडीदारामध्ये जशी चर्चा होते तशीच सुशांत आणि रियामध्ये झाली होती, त्यांच्यात भांडणं झाली नव्हती. मुंबईतील डॉक्टरांनी औषध न घेता दिल्लीतील ज्या डॉक्टरांना भेटलाही नाही त्या डॉक्टरांचे औषध घेणे चुकीचे आहे, असं रिया सुशांतला म्हणाली होती. त्यानंतर सुशांतने तिला तिच्या घरी जायला सांगितले.
मानेशिंदेंनी सांगितले की, सुशांतच्या कुटुंबाला त्याच्या उपचारांबाबत माहिती होती. 26 नोव्हेंबरला सुशांतची बहीण त्याच्या घरी आली होती आणि तिने श्रुती मोदीकडून सुशांतच्या उपचाराची माहिती घेतली होती. मुंबई पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात त्यांनी सुशांतची ट्रिटमेंट सुरू असल्याचं सांगितले. मात्र पाटणा पोलिसात खोटा जबाब दिला. आपल्याला 2019 पर्यंत त्याच्या उपचाराबाबत माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले. रियाने त्याच्या कुटुंबापासून काहीच लपवले नाही. तो आपल्या कुटुंबालाही भेटायचा. त्याच्यावर झालेल्या आध्यात्मिक उपचारांबाबत मला माहिती नाही, पर्यायी उपचार झाले असावेत.
सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपचे खरे कारण आले समोर
सुशांतने आत्महत्या केली हे सिद्ध झाले आहे. घटनेच्या वेळेचा विचार करता 8 ते 14 जूनपर्यंत रिया सुशांतच्या घरी नव्हतीच. तेव्हा त्याची बहीण त्याच्यासोबत होती. शिवाय एप्रिल 2019 मध्ये सुशांतचा आपल्या कुटुंबासह वाद झाला होता. त्याच्या बहिणीने रियाला अयोग्यरित्या स्पर्श केला होता, यावरून सुशांतचे त्याच्या बहिणीसह वाद झाले होते. सुशांत आपल्या कुटुंबाला भेटायचा. रियाने काहीच लपवलेले नाही. रियाला फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.