क्रीडा विषयावर सिनेमात काम करण्याची इच्छा- पूजा बत्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 06:32 AM2017-05-31T06:32:01+5:302017-05-31T12:02:41+5:30

रुपेरी पडद्यावर मिरर इमेज नावाचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून अभिनेत्री पूजा बत्रा हिंदी सिनेमात ब-याच वर्षांनंतर ...

Pooja Batra wishes to work on the subject of sports | क्रीडा विषयावर सिनेमात काम करण्याची इच्छा- पूजा बत्रा

क्रीडा विषयावर सिनेमात काम करण्याची इच्छा- पूजा बत्रा

googlenewsNext

/>रुपेरी पडद्यावर मिरर इमेज नावाचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून अभिनेत्री पूजा बत्रा हिंदी सिनेमात ब-याच वर्षांनंतर कमबॅक करत आहे.हा एक थ्रिलर सिनेमा असून, कथाही उत्कंठावर्धक आहे.या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री पूजा बत्राशी साधलेला हा संवाद


'मिरर इमेज' या शीर्षकावरुन या सिनेमाच्या कथेत काहीतरी गूढ असेल असं वाटतं आहे.सिनेमाची स्क्रीप्ट दिग्दर्शकानं ऐकवली तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती?

या सिनेमाचे दिग्दर्शक विजीत शर्मा यांनी या सिनेमातील भूमिकेसाठी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला सिनेमाची कथा वाचायला दिली.स्क्रीप्ट वाचताच ती एक वेगळी आणि नाविन्यपूर्ण कथा असल्याचं मला वाटलं. मी याआधी अशाप्रकारची भूमिका कधीच साकारली नव्हती. याआधी हॉलीवुडमध्ये 'वन अंडर द सन' आणि गेल्या वर्षी 'किलर पंजाबी' सिनेमात मी काम केलं. हिंदी सिनेमात कमबॅक करायचं तर काहीतरी वेगळं असेल, ज्यात मजा येईल असं काम करायचं होतं. त्यामुळेच हा सिनेमा स्वीकारला. याआधी माझी इतर कामं सुरु होती. मला त्यावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. त्यामुळे हिंदी सिनेमा स्वीकारले नव्हते.


एखादी भूमिका निवडताना तुझ्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ?

हॉलीवुडमध्ये मी काम केलेल्या सिनेमाची कथा वेगळी होती. त्यात काहीतरी नाविन्यपूर्ण होतं. भूमिकेत काहीतरी वेगळं साध्य होतं. त्यात बिल्कुल नाटकीपणा नव्हता. मला अशाच पद्धतीचं काम करायला आवडतं. त्याच त्याच पद्धतीच्या भूमिका साकारण्यात काहीही मजा नसते. कारण तिथे कलाकार म्हणून तुमची वाढ खुंटते असं मला वाटतं. त्यामुळेच अशा भूमिकांना तात्काळ नकार देते. माझ्या भूमिका निवडताना मी खूप काळजी घेते. या सिनेमातील भूमिकाही मला हटके वाटली. अशी स्क्रीप्ट माझ्याकडे आजवर कुणीच आणली नव्हती. त्यातील विषय भावला आणि रसिकांनाही माझी ही भूमिका आवडेल अशी आशा आहे.


तू स्वतः पंजाबी सिनेमात काम केलं आहे. प्रादेशिक सिनेमा चांगली कामगिरी करत आहेत. मराठी सिनेमांविषयी तू ऐकलं आहेस का ? मराठी सिनेमा पाहायला आवडेल का ?


आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत. इंटरनेट, टीव्ही या सगळ्या गोष्टी आहेत. असं असलं तरी सिनेमा पाहायचा तर तो सिनेमा हॉलमध्येच असं मला वाटतं. मराठी सिनेमांबाबत मी बरंच ऐकलं आहे. नक्कीच खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. इथं आल्यापासून मराठी सिनेमा पाहण्याची इच्छा झाली आहे. काही वर्षांआधी टूरिंग टॉकिज हा मराठी सिनेमा पाहिला होता. ऑस्करसाठी अमेरिकेत हा सिनेमा आला होता. तिथं तंबू लावून हा सिनेमा दाखवण्यात आला होता. तृप्ती भोईर यांचा हा सिनेमा खूप भावला होता. आणखी बरेच मराठी सिनेमा आहेत ज्यांची नावं ऐकली आहेत. त्याचं काम ऐकलंय, त्यामुळे आता मराठी सिनेमा नक्की पाहणार आहे.


तुझ्या ड्रीम रोलविषयी आणि सध्या इतर काय करतेस ते जाणून घ्यायला आवडेल?


मला आगामी काळात क्रीडा विषयावरील सिनेमा करण्याची इच्छा आहे. विशेषतःहाच माझा ड्रीम रोल आहे.महिलाप्रधान सिनेमाही चांगली कामगिरी करत आहेत. मी मार्शल आर्टचंही ट्रेनिंग घेत आहे.त्यामुळे मार्शल आर्टसवर सिनेमा काम करण्याची इच्छा आहे.


तू हॉलीवुडमध्येही काम केलं आहेस तर बॉलिवूड आणि हॉलीवुडमध्ये तुला काय फरक जाणवला ?

बॉलिवूड आणि हॉलीवुडमध्ये तांत्रिक बाबी सोडल्या तर फारसा काही फरक आहे असं मला वाटत नाही. भाषेचा फरक आहे आपल्याकडे हिंदी आहे, तिकडे इंग्रजी आहे. तिथे प्रोफेशनलिसम खूप आहे. तुम्ही तिथे लेट झालो अशी सबब सांगू शकत नाही. तांत्रिकदृष्ट्या ते पुढारलेले असतीलही तरीसुद्धा आपल्याकडील कलाकार हे त्यांच्यापेक्षा ग्रेट आहेत असं मला वाटतं.

Web Title: Pooja Batra wishes to work on the subject of sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.