Pooja Bhatt : “सगळा द्वेष सोशल मीडियावर, प्रेक्षकांना...”, ‘ब्रह्मास्त्र’ला ट्रोल करणाऱ्यांना पूजा भटचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 01:44 PM2022-09-15T13:44:06+5:302022-09-15T13:45:32+5:30
Pooja Bhatt On Brahmastra : रिलीजनंतर पाचच दिवसांत ‘ब्रह्मास्त्र’ने 150 कोटींची कमाई केली आहे. पण रिलीजआधी या चित्रपटावर बरीच टीका झाली. आता या सगळ्यावर आलियाची सावत्र बहिण पूजा भटने मौन सोडलं आहे...
आलिया भट (Alia Bhatt) व रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor ) ‘ब्रह्मास्त्र’ ( Brahmastra) रिलीज झाला आहे. रिलीजनंतर पाचच दिवसांत या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली आहे. पण रिलीजआधी या चित्रपटावर बरीच टीका झाली. कधी रणबीर कपूरचं एक जुनं वाक्य उकरून काढलं गेलं, कधी आलियाच्या विधानावरून तिला ट्रोल केलं गेलं. अगदी आलिया व रणबीरला उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाण्यापासूनही अडवलं गेलं. सोशल मीडियावर ‘बायकॉट ब्रह्मास्त्र’ ट्रेंडही जोरात चालला. पण 9 सप्टेंबरला चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई केली. आता या सगळ्यावर आलियाची सावत्र बहिण पूजा भटने (Pooja Bhatt ) मौन सोडलं आहे. बायकॉट कल्चरवर तिने परखड मत मांडलं.
‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत पूजाने ‘बायकॉट गँग’ला फैलावर घेतलं.
काय म्हणाली पूजा?
तिकिटं घेऊन चित्रपट पाहायला जाणारे प्रेक्षक सोशल मीडियावरच्या अजेंड्याची व या ठिकाणी पसरवल्या जाणाºया द्वेषाची पर्वा करत नाही. त्यांना फक्त एंटरटेनमेंट हवं असतं आणि त्यासाठीच ते सिनेमा पाहायला येतात. मी स्वत: ‘ब्रह्मास्त्र’चा सकाळी 9 चा शो बघितला. लोक चित्रपटाचा आनंद घेत होते. ते फक्त सिनेमा पाहायला आले होते. सोशल मीडियावर काय सुरू आहे, याच्याशी त्यांना देणंघेणं नव्हतं. सगळा द्वेष, नकारात्मकता सोशल मीडियावर आहे. कारण यासाठी फार पैसे मोजावे लागत नाहीत. पण तिकिट खरेदी करण्यासाठी खिशावर ताण पडतो. चित्रपट वाईट असेल असं मानून लोक तिकिट खरेदी करत नाहीत. आम्ही निराश केलं तर प्रेक्षक प्रामाणिकपणे सांगतात आणि चांगलं केलं तर आमच्यासाठी टाळ्या वाजवतात, आम्हाला डोक्यावर घेतात, असं पूजा म्हणाली.
पूजा भट लवकरच ‘चूप’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओल, दुलकर सलमान आणि श्रेया धनवंतरी लीड रोलमध्ये आहेत. येत्या 23 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. या चित्रपटाची कथा एका सीरिअल किलरभोवती फिरते, जो फिल्म क्रिटीक्सला आपलं लक्ष्य बनवत असतो.