'आम्हा दोघांना लग्न करायचं आहे '; 'या' कारणामुळे मोडलं होतं पूजा भट्ट अन् सोहेल खानचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 01:35 PM2023-04-24T13:35:18+5:302023-04-24T13:36:49+5:30
pooja bhatt: 'त्या' घटनेनंतर तिने सलमान खानसोबतही अबोला धरला
बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा भट्ट (pooja bhatt). ९० च्या काळात पुजाने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. मात्र, त्यानंतर तिने तिचा मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला. पूजा भट्टसिनेमांमध्ये जरी दिसत नसली तरीदेखील तिच्याविषयी सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. यामध्येच सध्या तिच्या लग्नाची चर्चा होताना दिसते. एकेकाळी पूजा अभिनेता सोहेल खानसोबत लग्न करणार होती. मात्र, त्यांचं लग्न होता होता राहिलं.
पूजा भट्ट आणि सलमान खान (salman khan) या दोघांनी जवळपास एकाचवेळी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याकाळी दोघंही आघाडीचे कलाकार होते. परंतु, तरीदेखील दोघांनीही कधीच एकत्र काम केलं नाही. यामागे अभिनेता सोहेल खान जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. त्याकाळी अशा काही घटना घडल्या होत्या ज्यामुळे पूजा, सलमानचा तिरस्कार करु लागली होती.
सोहेल खानवर होतं पूजाचं प्रेम
काही वर्षांपूर्वी पूजाने 'स्टारडस्ट'ला मुलाखत दिली होती. ही मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने सोहेलसोबत लग्न ठरल्याचं सांगितलं होतं.
"असे अनेक लोक होते जे आमच्या नात्याच्या आड येत आहेत. पण याविषयी चर्चा करुन आता मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. आम्ही लग्नासाठी तयार आहोत. सोहेल त्याच्या करिअरची सुरुवात दिग्दर्शक म्हणून करत आहे आणि मलाही सेट होण्यापूर्वी आणखी दोन वर्ष तरी काम करायचं आहे. पण, आम्हा दोघांनाही लग्न करायचं आहे", असं पूजा या मुलाखतीत म्हणाली होती.
सलीम खान यांनी दिला लग्नाला नकार
पूजा आणि सोहेल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सलीम खान यांनी या लग्नाला नकार दिल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नाही तर या गोष्टीचा राग मनात ठेऊन पूजाने सलमानसोबत काम न करायचा निर्णय घेतला.
'या' कारणामुळे करु लागली सलमानचा तिरस्कार
पूजा आणि सलमान राम या सिनेमात एकत्र काम करणार होते. या सिनेमाचं अर्ध्यापेक्षा जास्त चित्रीकरणही झालं होतं. मात्र, काही कारणास्तव हे चित्रीकरण अर्ध्यावर रखडलं. याच सिनेमाच्या सेटवर सोहेल आणि पूजाचं सूत जुळलं होतं. परंतु, हे नातं सलीम खान यांना मान्य नव्हतं. वडिलांचा नकार असल्यामुळे सलमानने पूजाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती त्याचा तिरस्कार करु लागली. दरम्यान, या घटनेनंतर पूजाने सलमानसोबत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. इतकंच नाही तर कित्येक वर्ष ती सलमानसोबत बोलतही नव्हती.