पूजा भट्ट म्हणते, मला डॅड अजूनही कळले नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:46 PM2018-09-20T16:46:11+5:302018-09-20T16:46:55+5:30
महेश भट्ट आज (२० सप्टेंबर) आपला ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज सकाळपासून महेश भट्ट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आलिया भट्ट आणि पूजा भट्ट यांनीही सोशल मीडियावर आपल्या डॅडला शुभेच्छा दिल्यात.
महेश भट्ट आज (२० सप्टेंबर) आपला ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज सकाळपासून महेश भट्ट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आलिया भट्ट आणि पूजा भट्ट यांनीही सोशल मीडियावर आपल्या डॅडला शुभेच्छा दिल्यात. या दोघींवरही आपल्या वडिलांचा प्रचंड प्रभाव आहे. विशेषत: पूजावर महेश भट्ट विशेष प्रभाव आहे. आता पूजा आपल्या वडिलांच्या आयुष्यावर एक माहितीपट अर्थात डॉक्युमेन्ट्री बनवणार आहे. होय, एका मुलाखतीत पूजाने हा खुलासा केला. मी भट्ट साहेबांच्या आयुष्यावर डॉक्युमेन्ट्री बनवणार, हे खरे आहे. पण त्यांचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी मी हे करतेय, असे कुणी अजिबात समजू नये. मी ही डॉक्युमेन्ट्री काढतेय, कारण मला स्वत:ला त्यांना समजून घ्यायचेय. ज्या व्यक्तिला मी पिता म्हणते, माझे मार्गदर्शक म्हणते, माझे गुरू म्हणते, ती व्यक्ती कशी आहे? हे मला जाणून घ्यायचे आहे. भट्ट साहेब माझ्या आयुष्याचे गाईडिंग फोर्स राहिले आहेत. माझेच नाही तर अनेकांचे. त्यांनी माझ्यासकट अनेकांच्या आयुष्याला योग्यवेळी योग्य दिशा दाखवली. त्यांनी आम्हाला खूप काही दिले. मी परमेश्वराचे आभार मानते की, मी त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यांच्यासाठी कुठलेही काम लहान-मोठे नाही़ ते जे करतात, ते मनातून करतात, मनातून करतात़ त्यांनी कुणाचेच खच्चीकरण केले नाही. दिग्दर्शक असल्याचा तोरा मिरवला नाही. सोबत काम करणाऱ्या कलाकारांनाही त्यांनी कायम स्वातंत्र्य दिले. त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. ते उर्जेचा स्रोत आहेत. त्यांना भेटून प्रत्येकजण चार्ज होतो. पण इतके असूनही ते नेमके कसे आहेत, हे मी समजू शकले नाही. फकीर आहेत, सूफी आहेत वा एक सामान्य माणूस आहेत. त्यांचे आयुष्य अतिशय साधेसरळ आहे. एकदा ‘चाहत’ चित्रपटाचे शूटींग सुरू असताना एक व्यक्ति एकटक महेश भट्ट यांच्याकडे बघत होती. महेश भट्ट यांनी त्याला जवळ बोलवले आणि असा का बघतोय माझ्याकडे म्हणून विचारले. यावर अंधारात आग चमकते, तुमच्यातही ती दिसते, असे ती व्यक्ति म्हणाली. खरचं महेश भट्ट आग आहेत, असे पूजा म्हणाली.