पूजा भट्टला या व्यक्तीची वाटतेय भिती; पोलिसात करणार तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 12:50 PM2017-02-23T12:50:38+5:302017-02-23T18:20:38+5:30
अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शिका पूजा भट्टला सध्या एका व्यक्तीची भिती वाटते आहे. एक व्यक्ती बॉलिवूड व इव्हेंट कंपन्यांशी संपर्क ...
अ िनेत्री, निर्माती व दिग्दर्शिका पूजा भट्टला सध्या एका व्यक्तीची भिती वाटते आहे. एक व्यक्ती बॉलिवूड व इव्हेंट कंपन्यांशी संपर्क साधून पूजा भट्टचा एजेंट असल्याचे सांगून फसवणूक करीत असून त्याच्या विरोधात आपण पोलिसांत तक्रार करणार असल्याचे पूजा भट्टने सांगितले आहे.
दिल है की मानता नही, सडक या सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी व जिस्म या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेली पूजा भट्ट हिला या प्रकारामुळे भिती वाटायला लागली असल्याचे सांगितले आहे. सॉलिट्युट लाईफस्टाईल इंकचा प्रशांत मालगेवार याच्या विरोधात पूजा पोलिसांत तक्रार करण्यात असल्याचा निर्णय तिने घेतला आहे. या संदर्भात तिने एक ट्विट केले आहे. पूजाने आपल्या ट्विटमध्ये लिहलेय, ‘या घटनेमुळे मला भिती वाटायला लागली आहे. सॉलिट्युट लाईफस्टाईल इंकचा प्रशांत मालगेवार नावाचा व्यक्ती स्वत:ला माझा एजेंट सांगून माझ्यावतीने इव्हेंट कंपन्यांकडून पैसे घेत आहे’. आपल्य पुढच्या ट्विटमध्ये पूजाने लिहले, ‘अशी वृत्ती धोकादायक आहे, प्रशांत मालगेकरच्या विरोधात कडक कार्यवाही करण्याची गरज आहे. प्रशांत मालगेवार माझा एजेंट किंवा प्रतिनिधी नाही, तो एक कारस्थानी व्यक्ती आहे, त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची गरज आहे.’
पूजाने याच वेळी अशा गोष्टींवरही आश्चर्य व्यक्त केले. मोठ्या प्रतिष्ठीत कंपन्या व व्यक्ती अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात तरी कसे, माझी स्वाक्षरी नसताना त्यांनी एका व्यक्तीला पैसे दिले तरी कसे? असा सवालही तिने के ला. एक व्यक्ती एका नामांकित इव्हेंट कंपनीच्या कार्यालयात जातो, आणि माझ्यावतीने पैसे घेण्याचा दावा करतो, कंपनीवाले देखील कोणताही दाखला किंवा पुरावा न मागता माझ्या स्वाक्षरी शिवाय पैशाचे आदनप्रदान कसे करतात.

Horrified that a man called Prashant Malgewar-Solitude Lifestyle Inc is masquerading as my agent & taking funds from event co's on my behalf— Pooja Bhatt (@PoojaB1972) February 23, 2017 ">http://
}}}}Horrified that a man called Prashant Malgewar-Solitude Lifestyle Inc is masquerading as my agent & taking funds from event co's on my behalf— Pooja Bhatt (@PoojaB1972) February 23, 2017