कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी आईने घातली पूजा; ‘महामृत्युंजय जप’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 06:16 PM2020-08-16T18:16:01+5:302020-08-16T18:16:48+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती बॉलिवूड माफियांविरोधातील व्हिडीओ पोस्ट करत आहे. यासाठी तिच्या आईला कायम तिची चिंता सतावत असते. म्हणून तिच्या आईने त्यांच्या राहत्या घरी महामृत्युंजय जप पूजा घातली होती.

Pooja performed by mother for Kangana Ranaut's safety; Video of chanting 'Mahamrityunjaya' goes viral !! | कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी आईने घातली पूजा; ‘महामृत्युंजय जप’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल!!

कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी आईने घातली पूजा; ‘महामृत्युंजय जप’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल!!

googlenewsNext

कंगना राणौत ही अत्यंत परखड बोलणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती तिच्या पोस्टच्या माध्यमातून विविध मुद्यांवर तिची प्रतिक्रिया देत असते. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती बॉलिवूड माफियांविरोधातील व्हिडीओ पोस्ट करत आहे. यासाठी तिच्या आईला कायम तिची चिंता सतावत असते. म्हणून तिच्या आईने त्यांच्या राहत्या घरी महामृत्युंजय जप पूजा घातली होती. या पूजेचा व्हिडीओ कंगनाने शेअर केला आहे. ज्यात कंगना पूजा करताना दिसत आहे. तिचे आई-वडील, महाराज दिसत आहेत.

तसेच दुसऱ्या  एका व्हिडीओत पूजेसाठी तिची आई बागेतील काही फुले, पाने गोळा करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले आहे की,‘आईला माझी काळजी कायम सतावत असते. त्यामुळे तिने माझ्यासाठी एक लाख पंधरा हजार महामृत्युंजयचा जाप करण्यासाठी तिने पूजा घातली होती. हा कार्यक्रम आज संपला आहे, मी घरातील सर्व सदस्यांचे आभार मानते.’

कंगना राणौत ही बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आहे. तिच्या अटींवर ती तिचे आयुष्य जगते. कुणाच्याही दबावाखाली ती स्वत:चे वक्तव्य करत नाही. बॉलिवूडमधूनही तिच्यावर अनेक टिका होताना दिसतात. बॉलिवूडमधील ‘सो कॉल्ड’ माफिया हे देखील तिच्यावर अनेकदा शेरेबाजी करत असतात. असो, आता कंगनासाठी करण्यात आलेला हा महामृत्युंजयचा जप तिचे रक्षण करो...

Web Title: Pooja performed by mother for Kangana Ranaut's safety; Video of chanting 'Mahamrityunjaya' goes viral !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.