Poonam Pandey : "माझी सर्व पापं धुतली गेली", पूनम पांडेने महाकुंभमध्ये केलं स्नान; चेंगराचेंगरीवर मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:04 IST2025-01-30T12:03:14+5:302025-01-30T12:04:27+5:30

Poonam Pandey : मौनी अमावस्येच्या निमित्ताने अभिनेत्री पूनम पांडे प्रयागराज येथील कुंभनगरीत पोहोचली.

Poonam Pandey holy dip in sangam prayagraj mahakumbh 2025 mauni Amavasya | Poonam Pandey : "माझी सर्व पापं धुतली गेली", पूनम पांडेने महाकुंभमध्ये केलं स्नान; चेंगराचेंगरीवर मोठं विधान

Poonam Pandey : "माझी सर्व पापं धुतली गेली", पूनम पांडेने महाकुंभमध्ये केलं स्नान; चेंगराचेंगरीवर मोठं विधान

महाकुंभसाठी कोट्यवधी लोक आले आहेत. श्रीमंत असो, गरीब असो, सर्वसामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी असो, या पवित्र प्रसंगी प्रत्येकजण स्नान करण्यासाठी प्रयागराजला पोहोचत आहे. याच दरम्यान, बॉलिवूड सेलिब्रिटी देखील महाकुंभाला भेट देत आहेत आणि दिव्य स्नान करत आहेत.

मौनी अमावस्येच्या निमित्ताने अभिनेत्री पूनम पांडेप्रयागराज येथील कुंभनगरीत पोहोचली. पूनम पांडेने आधीच महाकुंभसाठी जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. संगम तीरावर स्नान केल्यानंतर, होडीत बसून तिने काही वेळ फेरफटका मारला. महाकुंभमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इन्स्टावर स्टोरी शेअर करताना माझी सर्व पापं धुऊन गेली असं म्हटलं आहे. 

मौनी अमावस्येच्या रात्री प्रयागराजमधील संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल पूनम पांडेने दुःख व्यक्त केलं आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी पूनम पांडेनेही स्नान केलं. मौनी अमावस्येच्या दिवशी झालेली घटना खूप दुःखद आहे. अजूनही लोक इथे आहेत, पूर्वीसारखीच गर्दी आहे. शक्ती कमी होऊ शकते पण श्रद्धा कमी होता कामा नये. इथल्या भक्तीने मला निशब्द केलं आहे असं म्हटलं.

पूनम पांडेने स्नान करताना महाकाल असं लिहिलेला कुर्ता घातला होता. हात जोडून प्रार्थना केली आहे. तिने तिथल्या लोकांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले तसेच तेथील वातावरणाने मन प्रसन्न झाल्याचं देखील पूनमने म्हटलं आहे. 


Web Title: Poonam Pandey holy dip in sangam prayagraj mahakumbh 2025 mauni Amavasya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.