Poonam Pandey : "मला मारून टाका, फासावर चढवा..", सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या टीकेवर पूनम पांडेची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 02:23 PM2024-02-06T14:23:20+5:302024-02-06T14:23:49+5:30

Poonam Pandey reaction on Social Media Hate : पूनम पांडेने सोशल मीडियावर मिळणाऱ्या द्वेषावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Poonam Pandey reacts to netizens' criticism on social media, "Kill me, hang me." | Poonam Pandey : "मला मारून टाका, फासावर चढवा..", सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या टीकेवर पूनम पांडेची प्रतिक्रिया

Poonam Pandey : "मला मारून टाका, फासावर चढवा..", सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या टीकेवर पूनम पांडेची प्रतिक्रिया

सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिने स्वतःच्या निधनाचे खोटे वृत्त पसरवले. तिच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला होता. मात्र हे खोटं नाटक असल्याचे समजल्यावर सर्वांनी तिच्यावर निशाणा साधायला सुरूवात केली. दरम्यान आता तिने इंस्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत सोशल मीडियावरील टीकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पूनम पांडेने सोशल मीडियावर मिळणाऱ्या द्वेषावर आपली रिएक्शन देत म्हटले की, मला मारून टाका, मला फासावर चढवा, माझा द्वेष करा पण तुम्ही ज्यावर प्रेम करता, त्याला वाचवा. पूनम पांडेने श्बांग नामक मार्केटिंग एजेंसीसोबत मिळून हे अभियान राबवले होते. या एंजेसीने देखील तिच्या निधनाचे खोटे वृत्त पसरवल्यामुळे माफी मागितली होती आणि सांगितले होते की, सर्व्हायकल कॅन्सरसंदर्भात जनजागृती करण्यासाठी पूनम पांडेच्या या नाटकात सहभागी होते.

पूनम पांडेच्या या खोट्या निधनाच्या वृत्तामुळे लोक नाराज झाले आणि तिला चांगलेच खडेबोल लगावले. लोकांनी स्वस्त पीआर स्टंट म्हटलं तर कुणी फालतुगिरी म्हटली. खूप टीकेनंतर पूनम पांडेच्या एजेंसीने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले की, सर्व्हायकल कॅन्सरसंदर्भात जनजागृती करण्याचे आमचे ध्येय होते. २०२२ साली भारतात १,२३,९०७ सर्व्हायकल कॅन्सरचे केस आणि ७७, ३४८ मृत्यूची नोंद झाली. ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्व्हायकल कॅन्सर देशातील दुसरा घातक आजार आहे, जो मध्यम वयातील महिलांना होतो. तुमच्यापैकी बरेच लोकांना या आजाराबद्दल माहित नाही, मात्र पूनमची आईने खूप मोठ्या हिमतीने कॅन्सरचा सामना केला आहे.  

पूनम पांडेच्या एजन्सीने मागितली माफी
पूनम पांडेच्या एजेन्सीने जारी केलेल्या निवेदनात दावा केला की तिच्या जनजागृती मोहिमेमुळे, या देशाच्या इतिहासात प्रथमच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा शब्द १००० हून जास्त हेडलाइनमध्ये होता. आम्ही समजतो की आमच्या पद्धतींनी दृष्टिकोनाबद्दल वादविवाद केला असेल. एजेन्सी म्हणाली की गैरसोयीबद्दल आम्हाला खेद वाटतो, परंतु जर या कृतीने खूप आवश्यक जागरुकता वाढवली आणि मृत्यू टाळता आले तर त्याचा खरा परिणाम होईल."

Web Title: Poonam Pandey reacts to netizens' criticism on social media, "Kill me, hang me."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.