९०च्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रीला विना मेकअप ओळखणं झालंय कठीण, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 09:00 PM2019-09-29T21:00:00+5:302019-09-29T21:00:00+5:30
नव्वदच्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रीने अचानक बॉलिवूडमधून निरोप घेतला होता.
मिनाक्षी शेषाद्री नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतर अचानक मिनाक्षीने सिनेइंडस्ट्रीचा निरोप घेतला.
मिनाक्षी शेषाद्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. ती परदेशात स्थायिक झाली असून तिने काही वर्षांपूर्वी घायल वन्स अगेन या चित्रपटात काम केले होते. मात्र तिच्या लूकमध्ये आधीपेक्षा खूपच बदल झाला आहे. तिला विनामेकअप ओळखणं कठीण जात आहे.
मिनाक्षीने हिरो, बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. बॉलिवूडपासून दूर राहून ती आपल्या पतीला आणि कुटुंबियांना वेळ देत आहे.
ती अभिनय क्षेत्रात नसली तरी आपली नृत्याची आवड जोपासत आहे.
मिनाक्षी चित्रपटसृष्टीत असताना तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असायचे. तुम्हाला माहीत आहे का एका प्रसिद्ध गायकासोबतचे तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
कुमार सानू आणि मिनाक्षीचे अनेक वर्षं अफेअर होते. कुमार सानूची पहिली पत्नी रिटाने त्यांच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीलाच जबाबदार धरले होते. १९९४ला प्रकाशित झालेल्या फिल्मफेअर मासिकानुसार कुमारची पत्नी रिटाने घटस्फोटाची केस दाखल करताना मिनाक्षी त्यांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे घटस्फोटाच्या कारणामध्ये लिहिले होते.
फिल्मफेअरमध्ये ही बातमी आल्यानंतर या बातमीची चांगलीच चर्चा झाली होती. पण मिनाक्षीने यावर मौन राखणेच पसंत केले होते.