उदरनिर्वाहासाठी या प्रसिद्ध कलाकारावर आली भाजी विकण्याची वेळ, यातून कमावतोय पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 01:12 PM2020-04-24T13:12:51+5:302020-04-24T13:15:08+5:30
उदरनिर्वाहासाठी तो स्वतः भाजी विकत असून त्यातुन दोन पैसे कमावत आहे.
कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिका आणि सिनेमाचं शूटिंग बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. मात्र असेही काही कलाकार आहे ज्यांच्यावर आज आर्थिक संकट ओढावले आहे.
कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे बंद झाले आहेत. अनेकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा सर्वच घरात बंदिस्त असताना रोजीरोटीसाठी एक कलाकाराने अनोखी शक्कलच लढवली आहे. ओडियाचा प्रसिद्ध विनोदवीर रवी कुमार सायकलवर फिरुन घरोघरी जाऊन भाजीपालाची विक्री करतोय. उदरनिर्वाहासाठी तो स्वतः भाजी विकत असून त्यातुन दोन पैसे कमावत आहे. भाजी विकण्याची त्याची स्टाइलही अनोखी आहे. कलाकारांची मिमिक्री करत तो भाजी विकतो आणि ग्राहकाचे लक्ष वेधून घेत आहे.
रवीवर आर्थिक टंचाईचे संकट ओढावले आहे. त्याच्यावर दोन मुले आणि दिवंगत भावाच्या चार मुलांची जबाबदारी आहे. म्हणून भाजीपाला विकण्यास सुरुवात केल्याचेतो सांगतो. जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली त्या आधी तो 'बाली' नावाच्या ओडिया सिनेमाची शूटिंग करत होता. मात्र शूटिंगही बंद झाल्याने कमाईचे सारेच पर्याय बंद झाले. पैस्यांची चणचण दिवसेंदिवस वाढत असल्याने भाजी विकण्याचा निर्णय घेतला. भाजी विक्रीही अत्यावश्यक सेवांपैकी एक असल्याने या व्यवसायातून मला मोठा आधार मिळाल्याचे रवीने सांगितले. विशेष म्हणजे रवीने केवळ कुटुंबालाच आधार दिला नसून त्याच्या घराजवळ राहणा-या एका विधवा महिलेचीही आर्थिक मदत करतो. रवीने इतरांचा विचार करत त्यांची सेवाच तो करत असल्यामुळे नक्कीच इतरांसाठी देखील हे प्रेरणादायी आहे.