लोकप्रिय गायक अरमान मलिकने साखरपुडा उरकला, गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत थाटणार संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 15:41 IST2023-08-28T15:30:17+5:302023-08-28T15:41:41+5:30
अरमान आणि आशना 2019 पासून एकमेकांना डेट करत असून ते आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत

Popular singer Armaan Malik Aashna Shroff
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरमान मलिकने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गुड न्यूज दिली आहे. त्याने लॉंग टर्म गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत साखरपुडा उरकला. आशनासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडिया हँडलवर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.
and our forever has only just begun 🤍 pic.twitter.com/MMEin7jdMx— ARMAAN MALIK (@ArmaanMalik22) August 28, 2023
अरमान आणि आशना 2019 पासून एकमेकांना डेट करत असून ते आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनीही 28 ऑगस्टला हे फोटो शेअर केले. अरमान मलिकने कॅप्शनमध्ये म्हटले की, “आमच्या कायम एकत्र राहण्याच्या प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे. या फोटोंमध्ये अरमान आशनाला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. दोघांचे रोमॅंटिक फोटो पाहून बॉलीवूडमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
आशना श्रॉफ ही सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह असून ती एक लोकप्रिय युट्यूबर आणि ब्लॉगर आहे. फॅशन आणि ब्यूटीसंबंधित व्हिडीओ ती बनवत असते. आशना ही अरमानपेक्षा दोन वर्षांनी मोठी असल्याची माहिती आहे. आशनाचा जन्म 4 ऑगस्ट 1993 रोजी झाला, तर अरमानचा जन्म 22 जुलै 1995 ला झाला आहे.
अरमान मलिक हा प्रसिद्ध संगीतकार सरदार मलिक यांचा नातू आणि गायक अनु मलिक यांचा पुतण्या आहे.'जहर','बोल दो न जरा','पहला प्यार','मुझको बरसात बना लो','मैं रहूँ या न रहूँ' अशी अनेक सुपरहिट गाणी अरमान मलिकने गायली आहेत.