गंदी बात! एका पॉर्न व्हिडीओतून गहना वशिष्ठ कमावायची लाखो रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 11:41 AM2021-02-12T11:41:22+5:302021-02-12T11:54:40+5:30
Porn video racket: अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, पोलिसांना दिली माहिती
‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठला गेल्या रविवारी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आणि खळबळ माजली. पॉर्न व्हिडीओ शूट करून ते अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. सध्या पोलिस कोठडीत असलेल्या गहनाने आता काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
स्ट्रगलिंग अॅक्टर्सला पैशाचे आमीष दाखवून गहना पॉर्न व्हिडीओ शूट करायची, असे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. एका अॅक्टर्सला या शूटच्या बदल्यात ती 20 हजार रूपये द्यायची आणि याबदल्यात गहनाला स्वत:ही मोबदला मिळायचा.
होय, पोलिसांना गहनाने सांगितल्यानुसार, एक पॉर्न व्हिडीओ अपलोड करण्याच्या बदल्यात तिला अमेरिकेतील एका व्यक्तिकडून दोन ते अडीच लाख रूपये मिळत होती. यातील तिचा एकटीचा वाटा एक ते दीड लाख रूपये होता. म्हणजे, हे पैसे ती स्वत:कडे ठेवायची. गहनाने आत्तापर्यंत जवळपास 87 पॉर्नोग्राफी व्हिडीओ शूट केले आहेत. हे व्हिडीओ तिने तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत आणि यातून लाखो रूपयांची कमाई केली आहे.
मुंबई पोलिसांनी पोलिसांनी पॉर्न फिल्म बनवणा-या एका प्रोडक्शन कंपनीचा पदार्फाश केला होता. ही कंपनी स्ट्रगलिंग कलाकारांकडून शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचे अॅग्रीमेंट करून न्यूड शूट करून घेत असत तसेच नकार दिल्यास केस करण्याची धमकी देत असे. याप्रकरणी पोलिसांनी मालाड पश्चिममधील ग्रीन पार्क बंगल्यात छापा मारत 5 लोकांना अटक केली होती.
गहनाचे खरे नाव वंदना तिवारी आहे. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलून गहना वशिष्ठ केले. तिचे मित्र तिला जिंदगी नावानेही ओळखतात. कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलेल्या गहनाला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या आणि ती मॉडेलिंगकडे वळली.
तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. ‘बहनें’ या मालिकेत ती लीड रोलमध्ये दिसली होती. ‘फिल्मी दुनिया’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. काही तेलगू सिनेमातही ती झळकली आहे.
22 नोव्हेंबर 2019 रोजी एका वेबसीरिजचे शूटींग करताना तिला अचानक हृदयविकाराचा धक्का आला होता. यानंतर तिला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. अनेक दिवस रूग्णालयात राहिल्यानंतर तिने पुन्हा वापसी केली होती.