माझ्या नावाचा वापर थांबव नाहीतर...! नेहा कक्कर भडकली, एक्स-बॉयफ्रेन्डला दिली ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:23 AM2020-02-19T10:23:00+5:302020-02-19T10:23:56+5:30
नेहा आणि हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.
आपल्या आवाजाने तरूणाईला वेड लावणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. अनेक प्रयत्नानंतर नेहा ब्रेकअपच्या या दु:खातून बाहेर आली. पण काल परवा हिमांश कोहलीने नेहावर अनेक आरोप केलेत आणि जखम पुन्हा ताजी झाली. हिमांशच्या आरोपांमुळे नेहा जाम संतापली. माझ्या व माझ्या कुटुंबापासून दूर राहा, असा इशाराच तिने दिला.
काय म्हणाली नेहा
नेहाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून हिमांशला ताकीद दिली. तिने पोस्टमध्ये लिहिले, ‘जे लोक वाईट बोलतात. ते माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत. ते खोटारडे आणि माझ्यावर जळणारे आहे. चर्चेत राहण्यासाठी हे लोक माझ्या नावाचा वापर करतात. यापूर्वीही असे झाले आणि आता माझ्या मागून माझ्या नावाचा वापर त्यांनी चालवला आहे. स्वत: काम करा आणि प्रसिद्धी मिळवा. माझ्या नावाचा वापर करू नका.’
ती पुढे लिहिते,‘ मी तोंड उघडले तर तुझी आई, बाबा आणि बहीण सर्वांचे खरे चेहरे जगाच्या समोर येतील. त्यांनी माझ्यासोबत जे केले, मला जे काही बोलले, ते सर्व मी जगाला सांगेन. माझ्या नावाचा वापर करण्याची हिंमत करु नकोस. जगासमोर मला खलनायिका बनवून तू बिचारा होण्याचा प्रयत्न करु नकोस. मी, माझे नाव आणि माज्या कुटुंबापासून दूर रहा, ही तंबी समज’
काय म्हणाला होता हिमांश कोहली
नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीने नुकतीच बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी त्यो नेहावर अनेक आरोप केले होते. तो म्हणाला होता, ‘माझ्याकडून हे वाईट ब्रेकअप झाले नव्हतेच. पण चर्चा सुरु झाल्या आणि सगळ्या गोष्टी बिघडायला लागल्या. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट काळ होता. आता मी त्यातून बाहेर आलो आहे. पण त्यावेळी लोकांच्या नजरेत मी विलेन ठरलो. मला सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले गेले. कुणालाही रिअल स्टोरी माहित नाही आणि तरीही मला सरसकट खलनायक ठरवले गेले. ती टीव्हीवर रडली आणि लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला. सगळा दोष माझ्या माथ्यावर फोडून ती नामनिराळी राहिली. मी सुद्धा बोलावे, असे मला अनेकदा वाटले. पण मी योग्य वेळेची प्रतीक्षा करायचे ठरवले. माझा तो निर्णय अगदी योग्य होता. कारण कालांतराने माझ्या मनातला राग कमी झाला. शेवटी एकेकाळी ज्या व्यक्तिवर मी जीवापाड प्रेम केले, तिच्याविरोधात मी कसा काय बोलू शकतो. ती माझ्या प्रेमाची व्याख्या नव्हती. तू माझ्यासोबत असे का केलेस, हा प्रश्न मी तिला कधीच केला नाही. पण या सगळ्यामुळे मी प्रचंड हर्ट झालो.’