नर्गिसची ही पोस्ट कुणासाठी??

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2016 01:30 PM2016-08-13T13:30:59+5:302016-08-13T19:08:24+5:30

भूतकाळातील कुठल्याही गोष्टीचा स्वत:वर परिणाम होऊ द्यायचा नाही, हेच नर्गिसने पक्के ठरवलेले दिसतेय. किमान तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून तरी तसेच दिसते. भूतकाळातील चूक सुधारल्यानंतर आता नर्गिस ‘सिंगल’ झालीय आणि कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नसल्याने ती प्रचंड आनंदी आहे, याचे संकेत देणारी ही पोस्ट आहे.

This post for Kargis ?? | नर्गिसची ही पोस्ट कुणासाठी??

नर्गिसची ही पोस्ट कुणासाठी??

googlenewsNext
यफ्रेन्ड उदय चोपडासोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नरगिस फखरी अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्या आपण मध्यंतरी ऐकल्या. अर्थात नर्गिसने लगेच या बातम्या निव्वळ बकवास असल्याचे स्पष्ट केले. अलीकडेच नर्गिस भारतात परतली आणि परतल्या परतल्या तिचा आगामी चित्रपट ‘बॅन्जो’च्या प्रमोशनमध्ये बिझी झाली. याशिवाय नर्गिसने एक नवा हॉलिवूड प्रोजेक्टही साईन केला आहे. एकंदर भूतकाळातील कुठल्याही गोष्टीचा स्वत:वर परिणाम होऊ द्यायचा नाही, हेच नर्गिसने पक्के ठरवलेले दिसतेय. किमान तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून तरी तसेच दिसते. भूतकाळातील चूक सुधारल्यानंतर आता नर्गिस ‘सिंगल’ झालीय आणि कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नसल्याने ती प्रचंड आनंदी आहे, याचे संकेत देणारी ही पोस्ट आहे. विशेष म्हणजे, भूतकाळात तिच्या आयुष्यात असलेल्या एका व्यक्तिबद्दलचा रागही अप्रत्यक्षपणे या पोस्टमधून व्यक्त झाला आहे.  नर्गिसने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.how comfortably you sleep when you are single and no one is cheating on you असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. आता नर्गिसने फोटोला दिलेले हे कॅप्शन उदयकडे अंगुलीनिर्देश करणारे आहे की अगदी सहज लिहिलेय, हे समजण्याइतपत तुम्ही आम्ही नक्कीच शहाणे आहोत, होय ना!!



Web Title: This post for Kargis ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.