पोस्टर बॉइजचा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 10:25 AM2017-07-24T10:25:35+5:302017-07-24T15:55:46+5:30

फिल्म पोस्टर बॉइजचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. त्याच बरोबर चित्रपटाचा ट्रेलर ही आऊट झाला आहे.  सनी देओल, बॉबी ...

Poster Boys Trailer Out | पोस्टर बॉइजचा ट्रेलर आऊट

पोस्टर बॉइजचा ट्रेलर आऊट

googlenewsNext
ल्म पोस्टर बॉइजचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. त्याच बरोबर चित्रपटाचा ट्रेलर ही आऊट झाला आहे.  सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे खूपच वेगळ्या अंदाजात दिसता येते. ट्रेलरमध्ये तिघांना ही दाखवण्यात आले आहे. ट्रेलरला बघून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली ती म्हणजे चित्रपट कॉमेडी आणि अॅक्शनने भरलेला आहे. सनी देओल प्रेक्षकांना  पुन्हा एकदा मोठ्या पडद्याववर अॅक्शन करताना दिसणार आहे. यात सनीच्या भूमिकेचे नाव जगावर चौधरी, बॉबी देओल विनय शर्मा तर श्रेयस तळपदे अर्जुन सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. तिघांच्या भूमिका एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. तिघही एकाच वेळा अडचणीत सापडतात. एक चुकीमुळे तिघांचे आयुष्य कसे बदलून जाते याची मजेदार गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  या चित्रपटातून श्रेयस तळपदेने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. 

या ट्रेलरला दिलेर मेहंदी यांनी गायले आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेदार आहे. पोस्टर ब्वॉइज हा एका मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. मराठीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. या चित्रपटाची निर्मिती श्रेयस तळपदेने केली होती.
यमला पगवा दिवाना 2 नंतर पुन्हा एकदा सनी देओल आणि बॉबी देओलची जोडी एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट 8 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सध्या सनी देओल भैय्याजी सुपरहिट चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत प्रिती झिंटा आणि अमिषा पटेलही दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील सेटवर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Web Title: Poster Boys Trailer Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.