प्रभासला अॅक्टींग व्यतिरिक्त आहे 'या' गोष्टीचेही वेड,जाणून घ्या त्याच्या लग्जरीस आवडी-निवडीविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:54 PM2019-01-26T17:54:14+5:302019-01-26T17:59:04+5:30

प्रभासने 2002 मध्ये 'ईश्वर' चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता. त्याने 'राघवेंद्र' (2003), 'वर्षम' (2004), 'चक्रम' (2005), 'योगी' (2007), 'एक निरंजन' (2009), 'रेबेल' (2012) 'बाहुबली : द बिगनिंग' (2015) और बाहुबली : द कन्क्लूजन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Prabhas is in Addition to acting, the craze for the 'this' thing, know about his luxury choice | प्रभासला अॅक्टींग व्यतिरिक्त आहे 'या' गोष्टीचेही वेड,जाणून घ्या त्याच्या लग्जरीस आवडी-निवडीविषयी

प्रभासला अॅक्टींग व्यतिरिक्त आहे 'या' गोष्टीचेही वेड,जाणून घ्या त्याच्या लग्जरीस आवडी-निवडीविषयी

googlenewsNext

तमिळ आणि तेलूगु सिनेमाचा स्टार प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र बाहुबली- द बिगिनिंग आणि बाहुबली- द कन्कल्युजन या सिनेमातील भूमिकेमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहचली आहे. तो जे काही करतो त्याची चर्चा होते. मग ते अनुष्का शेट्टीसह अफेअर किंवा लग्नाच्या गोष्टी असो किंवा कोस्टारसह त्याचे अफेअर किंवा मग आणखी काही गोष्ट. प्रत्येक गोष्टीमुळे प्रभासची चर्चाच होतेच. शिवाय त्याला कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या गोष्टी नाही आवडत या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी त्याचे चाहते आतुर झालेले असतात. त्याच्या चाहत्यांसाठी खास ही माहिती आज आम्ही देत आहोत ते म्हणजे प्रभासही इतर बड्या स्टार्सप्रमाणे अगदी लग्झरी लाईफ एन्जाय करतो. इतकेच नाहीतर त्याच्या आवडी -निवडी ही अगदी त्याच्या लाइफस्टाइलनुसारच हटके आहेत. प्रभासला लग्जरी लाइफस्टाइलसोबतच कारचा छंद आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये रोल्स रॉयल फँटम, रेंज रोवर , जगुआर XJ, बीएमडब्ल्यू X3, स्कोडा सुपर्ब सारख्या लग्जरी कारचे कलेक्शन त्याच्याकडे आहे.

प्रभासला विशेषतः तेलुगु सिनेमासाठी ओळखले जाते. 2002 मध्ये 'ईश्वर' चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता. त्याने 'राघवेंद्र' (2003), 'वर्षम' (2004), 'चक्रम' (2005), 'योगी' (2007), 'एक निरंजन' (2009), 'रेबेल' (2012) 'बाहुबली : द बिगनिंग' (2015) और बाहुबली : द कन्क्लूजन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'बाहुबली'च्या फर्स्ट पार्टसाठी प्रभासने 25 कोटी फिस घेतली होती. पण चित्रपाटच्या सक्सेसनंतर त्याने आपली फीस 30 कोटी केली होती. त्याच्या एका फीसने छोट्या बजेटचे 6 चित्रपट तयार होऊ शकतात.

Web Title: Prabhas is in Addition to acting, the craze for the 'this' thing, know about his luxury choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास