Adipurush trailer: 'आदिपुरुष'ला मोठा धक्का; प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 12:26 PM2023-05-09T12:26:48+5:302023-05-09T12:29:37+5:30

Adipurush: आज या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे.  

prabhas and kriti senon starrer adipurush trailer got leaked before its official release | Adipurush trailer: 'आदिपुरुष'ला मोठा धक्का; प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Adipurush trailer: 'आदिपुरुष'ला मोठा धक्का; प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

प्रसिद्ध मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याच्या आदिपुरुष या सिनेमाची सध्या तुफान चर्चा रंगत आहे. ओम राऊत यांनी तान्हाजीनंतर आदिपुरुषची घोषणा केली आणि तेव्हापासून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु, या उत्साहाला गालबोट लागलं आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे.  त्यामुळे सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या आनंदावर पाणी पडलं आहे.

प्रभास(Prabhas)चा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) याचा ट्रेलर आज (९ मे) रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, एक दिवस आधीच त्याचा ट्रेलर लीक झाला. ज्यामुळे ओम राऊतसह प्रभासनेही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.

नेमका कसा लीक झाला ट्रेलर?

हा चित्रपट रामायणावर आधारित असून दोन-तीन दिवसांपूर्वी या ट्रेलर प्रदर्शनाच्या अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आली होती. तसंच ८ मे रोजी चित्रपटाच्या काही खास चाहत्यांसाठी हैदराबादमध्ये ट्रेलरचं स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. मात्र, यावेळी काही चाहत्यांनी हा ट्रेलर मोबाईलवर शूट केला आणि तो व्हिडीओ व्हायरल केला.

नेमकं काय आहे या ट्रेलरमध्ये?

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे तिघेही वनवासात जाताना दिसत आहेत. तसंच वनवासात असताना राम आणि लक्ष्मण हे शबरीने दिलेली उष्टी बोरे खातात. त्यानंतर या ट्रेलरमध्ये हनुमानाची भूमिका साकारत असलेल्या अभिनेता देवदत्त नागेची एन्ट्री होते. लक्ष्मणाला बरे करण्यासाठी तो द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना दिसून येत आहे. त्यानंतर राम-लक्ष्मण वानरसेनेसह रामसेतूवरून श्रीलंकेला जाताना दिसत आहेत. इतकंच नाही तर यात वानरसेना आणि लक्ष्मणाच्या सैन्यांमधील युद्ध दाखवण्यात आले आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी रावणाची या सिनेमात एन्ट्री होते. परंतु, या चित्रपटाच्या व्हीएफएक्समध्ये मोठे बदल करण्यात आल्याचं ट्रेलरमधून स्पष्टपणे जाणवत आहे.

दरम्यान, या सिनेमात प्रभास (Prabhas) हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) सीतेची भूमिका साकारणार आहे. तसंच देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारत आहे.  हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.


 

Web Title: prabhas and kriti senon starrer adipurush trailer got leaked before its official release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.