Deepika Padukone ला आवडतात साऊथचे हे दोन सुपरस्टार्स, त्यांच्यासोबत करण्यासाठी आहे उत्सुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 07:00 PM2022-02-11T19:00:01+5:302022-02-11T19:02:57+5:30

दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला तेलुगू सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआर आणि अल्लू अर्जुन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे.

Prabhas costar Deepika Padukone likes this superstar of south cinema | Deepika Padukone ला आवडतात साऊथचे हे दोन सुपरस्टार्स, त्यांच्यासोबत करण्यासाठी आहे उत्सुक!

Deepika Padukone ला आवडतात साऊथचे हे दोन सुपरस्टार्स, त्यांच्यासोबत करण्यासाठी आहे उत्सुक!

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आगामी 'प्रोजेस्ट' सिनेमाच्या माध्यमातून टॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. या सिनेमात ती बाहुबली फेम अभिनेता प्रभाससोबत (Prabhas) दिसणार आहे. पहिल्यांदाच हे दोन सुपरस्टार एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे दोघांचेही फॅन्स त्यांना एकत्र बघण्यासाठी आतुर झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने साऊथ दुसऱ्या सुपरस्टारसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला तेलुगू सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआर आणि अल्लू अर्जुन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. आता तिची ही इच्छा कधी पूर्ण होते आणि तिला या स्टार्ससोबत बघण्याची संधी तिच्या फॅन्सना कधी मिळते हे बघावं लागेल.

दीपिकाला मुलाखतीत विचारण्यात आलं की, पुढे कुणासोबत काम करण्याची इच्छा आहे. तर यावर ती म्हणाली की, 'RRR सिनेमाचा अभिनेता ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR) आणि 'पुष्पा' स्टार अभिनेता अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) काम करायला आवडेल. ती असंही म्हणाली की, ज्यूनिअर एनटीआरसोबत काम करण्यासाठी ती उत्सुक आहे. तिला त्याच्यात एक अविश्वसनीय व्यक्तीत्व दिसलं. सोबतच अल्लू अर्जुन एक शानदार आणि फनटॅस्टिक अभिनेता आहे.

'प्रोजेक्ट'बाबत सांगायचं तर दीपिका या सिनेमाच्या माध्यमातून टॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. सिनेमाचं दुसरं शेड्यूल फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हैद्राबागमध्ये सुरू होणार आहे. प्रभास आणि दीपिका या शेड्यूलमध्ये एकत्र असणार आहेत. या शेड्यूलमध्ये सिनेमाचा मोठा भाग शूट केला जाणार आहे.

या सिनेमात मेगास्टार अमिताभ बच्चन यांचीही महत्वाची भूमिका असणार आहे. पण ते पुढील शेड्यूलमध्ये शूटसाठी येणार आहेत. हा सिनेमा एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे. ज्याची निर्मिती वैजयंती मुव्हीजकडून केली जात आहे. तर नाग अश्विन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. त्याशिवाय प्रभासचे 'सलार' आणि 'आदिपुरूष' हे सिनेमेही येणार आहेत.
 

Web Title: Prabhas costar Deepika Padukone likes this superstar of south cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.