‘राधेश्याम’ पाहिल्यानंतर प्रभासच्या चाहत्याची आत्महत्या, कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 04:11 PM2022-03-15T16:11:52+5:302022-03-15T16:14:41+5:30

‘बाहुबली’ फेम साऊथ सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘राधेश्याम’  (Radhe Shyam)हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. पण या चित्रपटानंतर प्रभासच्या एका चाहत्याने असं काही केलं की, सगळ्यांनाच धक्का बसला.

prabhas fan committed suicide after radhe shyam negative reviews | ‘राधेश्याम’ पाहिल्यानंतर प्रभासच्या चाहत्याची आत्महत्या, कारण वाचून बसेल धक्का

‘राधेश्याम’ पाहिल्यानंतर प्रभासच्या चाहत्याची आत्महत्या, कारण वाचून बसेल धक्का

googlenewsNext

‘बाहुबली’ फेम साऊथ सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘राधेश्याम’  (Radhe Shyam)हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. पण या चित्रपटानंतर प्रभासच्या एका चाहत्याने असं काही केलं की, सगळ्यांनाच धक्का बसला. या चाहत्याने गळफास लावून आत्महत्या केली. रवी तेजा असं या आत्महत्या केलेल्या चाहत्याचं नाव आहे.
प्रभास आणि  पूजा हेगडे यांचा बहुचर्चित ‘राधे श्याम’ गत 11 मार्चला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. परंतु या चित्रपटाला हवा तसा रिस्पॉन्स मिळताना दिसून येत नाहीये. हीच गोष्ट प्रभासचा चाहता रवी तेजाला सहन झाली नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं.

‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार, 24 वर्षांचा रवी तेजा आंध्र प्रदेशमधील टिळक नगरचा राहणारा. हे गाव आंध्र प्रदेशातील कर्नूल या जिल्ह्याअंतर्गत येतं.  रवी तेजा हा अभिनेता प्रभासचा जबरा फॅन होता. प्रभासच्या ‘राधे श्याम’कडून त्याला प्रचंड अपेक्षा होत्या. पण‘राधे श्याम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट म्हणावा तसा प्रभाव पाडू शकला नाही. प्रभासच्या चित्रपटाला  मिळत असलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे रवी प्रचंड  निराश झाला आणि यामुळे पंख्याला गळफास लावून त्याने आपली जीवनयात्रा संपवली.
 रिपोर्ट्सनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी  रवी तेजानं आपल्या आईला चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल सांगितलं होतं.  पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.


  
या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. राधा कृष्ण कुमार यांनी ‘राधे श्याम’चं दिग्दर्शन केलं आहे. या व्यतिरिक्त अभिनेत्री भाग्यश्री, सत्यराज, कृष्णम राजू, जगपती बाबू, सचिन खेडकर, प्रियदर्शी, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर आणि जयराम या कलाकारांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रभासच्या नावामुळे हा चित्रपट तग धरून आहे. पण क्रिटिक्स व प्रेक्षकांनी प्रभासच्या या सिनेमाकडे पाठ फिरवलेली दिसतेय.  

Web Title: prabhas fan committed suicide after radhe shyam negative reviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.