दीपवीरनंतर ‘बाहुबली’ प्रभासही अडकणार लग्नाच्या बेडीत!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 08:39 PM2018-10-26T20:39:08+5:302018-10-26T20:39:28+5:30
दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासही बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे.
दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासही बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभासच्या लग्नाबद्दलच्या बातम्या येत आहे. पण ताजी बातमी खरी मानाल तर ‘साहो’च्या रिलीजआधी प्रभास लग्नाच्या बेडीत अडकू शकतो. होय, २०१९ मध्ये प्रभास लग्न करणार, अशी बातमी आहे. त्याच्या कुटुंबाशी जवळ असलेल्या एका सूूत्राने हा दावा केला आहे. प्रभास ‘बाहुबली’ रिलीज झाल्यानंतर लग्न करणार होता. पण ‘साहो’मुळे त्याने लग्नाचा बेत पुढे ढकलला. ‘साहो’साठी त्याला बराच वेळ द्यावा लागणार होता. बरीच तयारी करायची होती. त्यामुळे या काळात लग्नाचा विचार त्याने बाजूला ठेवला. पण आता ‘साहो’ हातावेगळा करताच प्रभास लग्न करणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. अर्थात प्रभास कुणासोबत लग्न करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मध्यंतरी प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या वावड्या उठल्या होत्या.
‘साहो’नंतर प्रभासने पुन्हा एकदा साऊथचाच एक चित्रपट साईन केला आहे. दिग्दर्शक के के राधाकृष्ण यांचा हा चित्रपट युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. या चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण लवकरच या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल सुरू होणार आहे. खुद्द प्रभासने आपल्या सोशल अकाऊंटवर याची घोषणा केली होती. युरोपच्या पार्श्वभूमीवर असलेला प्रभासचा हा आगामी चित्रपटही बिग बजेट चित्रपट असणार आहे.